Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सीवूड्सच्या खड्डेमय रस्त्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मनपाला १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’

mosami kewat by mosami kewat
July 28, 2025
in बातमी
0
सीवूड्सच्या खड्डेमय रस्त्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मनपाला १५ दिवसांचा 'अल्टिमेटम'

सीवूड्सच्या खड्डेमय रस्त्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मनपाला १५ दिवसांचा 'अल्टिमेटम'

       

नवी मुंबई : सीवूड्स परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) दुर्लक्षाविरोधात वंचित बहुजन आघाडीने (VBA) आज पालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यासमोर तीव्र निदर्शने केली. १५ दिवसांच्या आत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे विभाग अध्यक्ष ॲड. उमेश हातेकर यांनी यावेळी दिला.
‎
‎गेल्या अनेक दिवसांपासून सीवूड्समधील नागरिक खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही पालिका प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप ॲड. हातेकर यांनी केला. आज त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आयुक्त कैलास शिंदे यांच्या गाडीसमोर निदर्शने केली.
‎
‎यावेळी ॲड. उमेश हातेकर यांनी महानगरपालिका परिसरातील रस्ते आणि नागरिकांसाठी असलेल्या रस्त्यांमध्ये दुजाभाव का, असा सवाल उपस्थित केला. बाहेर काढा, बाहेर काढा, आयुक्त साहेब खड्ड्यातून आम्हांला बाहेर काढा, आयुक्त साहेब, आपल्या बंगल्यासमोरील जसा रस्ता आहे, तसाच सीवूड्सवासीयांना बनवून द्या, अशा घोषणांनी पालिका मुख्यालयासमोरचा परिसर दणाणून गेला.
‎
‎या आंदोलनात वंचित बहुजन महिला आघाडीच्या महासचिव साक्षीताई लोटे, समाजवादी पक्षाचे नवी मुंबई उपाध्यक्ष मिथुन कांबळे, माधुरीताई सरोदे, अक्षय भंडगे, स्वप्निल येवले, नितीन पाडळे, तनवीर शेख, संघपाल मनवर, आणि संघदीप झनके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
‎
‎


       
Tags: Civic negligencenavi mumbaiNavi Mumbai Municipal Corporation (NMMC)vbaforindia
Previous Post

‎UPI व्यवहारांसाठी १ ऑगस्टपासून नवीन नियम: मर्यादा, वेळेचे बंधन आणि बरेच काही!

Next Post

जनसुरक्षा नव्हे हा तर भस्मासूर!

Next Post
जनसुरक्षा नव्हे हा तर भस्मासूर!

जनसुरक्षा नव्हे हा तर भस्मासूर!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home