मुंबई : मुंबई आणि ठाण्यात धुमाकूळ घालणाऱ्या एका कुख्यात इराणी टोळीच्या सदस्याला सांताक्रूझ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हुसैनी मुख्तार इराणी ऊर्फ ‘गाझनी’ असे या २६ वर्षीय आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे पोलिसांच्या १३ दिवसांच्या अथक परिश्रमाला यश आले आहे.
२३ ऑगस्ट रोजी सकाळी सांताक्रूझमध्ये ७७ वर्षीय सेवानिवृत्त बँक अधिकारी देवदास रांगणेकर यांना अडवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्यात आली होती. “गणपती मंदिर कुठे आहे?” असा प्रश्न विचारून आरोपींनी त्यांना गाफील केले आणि संधी साधून पोबारा केला. रांगणेकर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील तब्बल २५० ते ३५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणासोबतच खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली. आरोपी कल्याणच्या अंबिवली भागातील इराणी वस्तीमध्ये लपून बसल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून ‘गाझनी’ला अटक केली. त्याच्यावर यापूर्वीच मुंबई आणि ठाण्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये साखळी चोरीसह हल्ल्याचे १० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...
Read moreDetails