Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

‎‎‎India Women vs Australia Women 1st ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत स्मृती मानधना ५८ धावांवर धावबाद, भारताची शतकी सलामीची जोडी तुटली

mosami kewat by mosami kewat
September 14, 2025
in क्रीडा, बातमी
0
‎‎‎India Women vs Australia Women 1st ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत स्मृती मानधना ५८ धावांवर धावबाद, भारताची शतकी सलामीची जोडी तुटली

‎‎‎India Women vs Australia Women 1st ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत स्मृती मानधना ५८ धावांवर धावबाद, भारताची शतकी सलामीची जोडी तुटली

‎‎India Women vs Australia Women 1st ODI : भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये धावबाद झाली. यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना आज वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.
‎
‎भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात दमदार झाली. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची शतकी भागीदारी केली. दोघींनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. पण, ११४ धावांवर असताना दोघींमध्ये धाव घेण्यावरुन गैरसमज झाला आणि स्मृती मानधना ५८ धावांवर धावबाद झाली.
‎
‎स्मृती आणि प्रतिका यांच्यातील ताळमेळाचा अभाव आज पहिल्यांदाच दिसलेला नाही. आश्चर्य म्हणजे, मात्र प्रतिकासोबतच्या १५ डावांत ती तीन वेळा धावबाद झाली आहे. या तिन्ही वेळी त्यांच्यातील ताळमेळाचा अभाव स्पष्ट दिसून आला आहे.
‎
‎या सामन्यात स्मृती मानधनाने ५८ धावांची खेळी केली. यामुळे ती आणि प्रतिका रावल ही महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीची जोडी बनली आहे. १५ डावांमध्ये त्यांनी ८० पेक्षा अधिकच्या सरासरीने १००० हून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत इंग्लंडची अॅटकिन्स आणि टेलर ही जोडी ६८.८३ च्या सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
‎
‎स्मृतीच्या धावबाद होण्यामुळे भारताला मोठा धक्का बसला असला तरी, संघाची फलंदाजी अजूनही मजबूत स्थितीत आहे.

Tags: australiacricket‎‎India Women vs Australia Women 1st ODIodiPakistanPratika Rawalsmriti mandhanaWankhede Stadiumwoman
Previous Post

Pune Metro Negligence : पुणे मेट्रोच्या नियोजनशून्य कामामुळे पिंपरीत १६ दुचाकीचालक जखमी

Next Post

Mumbai Crime : मुंबई-ठाण्यात धुमाकूळ घालणाऱ्या साखळी चोराला सांताक्रूझ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next Post
मुंबई-ठाण्यात धुमाकूळ घालणाऱ्या साखळी चोराला सांताक्रूझ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai Crime : मुंबई-ठाण्यात धुमाकूळ घालणाऱ्या साखळी चोराला सांताक्रूझ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट
Uncategorized

मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट

by mosami kewat
June 20, 2026
0

मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेशच्या वतीने शुक्रवारी (दि.१९) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त (प्रशासन) अश्विनी भिडे यांची भेट घेऊन मुंबईतील विविध...

Read moreDetails
NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश

NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश

June 20, 2026
परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

June 19, 2026
16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

June 19, 2026
चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

June 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home