मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांना सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे निवेदन देऊन नवीन हॅाल तिकीट देण्याची विनंती करण्यात आली.
अहिरे यांनी २३ जानेवारी पासून नवीन हॅाल तिकीट online देण्याचे मान्य केले आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना 10 मिनिटं उशीर झाला तरी परीक्षेत बसू देणार, असे मान्य केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय उपस्थित होते.