Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आरक्षण हटाओ आंदोलन की ‘जातीवादी मिलन समारोह’! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्ला; ‘ब्राह्मणवाद, ठाकूरवाद जिंदाबाद’च्या घोषणांनी पेटला वाद

mosami kewat by mosami kewat
August 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आरक्षण हटाओ आंदोलन की 'जातीवादी मिलन समारोह'! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्ला; 'ब्राह्मणवाद, ठाकूरवाद जिंदाबाद'च्या घोषणांनी पेटला वाद

आरक्षण हटाओ आंदोलन की 'जातीवादी मिलन समारोह'! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्ला; 'ब्राह्मणवाद, ठाकूरवाद जिंदाबाद'च्या घोषणांनी पेटला वाद

       

मुंबई : आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे मूळ स्वरूप आणि त्यामागील मानसिकतेवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. “आरक्षण हटाओ आंदोलन = जातिवादी मिलन समारोह! आप इस जातिवाद के नंगे प्रदर्शन को क्या कहेंगे?” अशा कडक शब्दांत ट्विट करत ॲड. आंबेडकरांनी या आंदोलनाचा खरा मुखवटा गळून पडल्याचे दाखवले.

मिळालेल्या माहितीनुसार, देशात एका बाजूला सामाजिक न्यायाचे प्रतीक असणाऱ्या आरक्षणाला विरोध दर्शवण्यासाठी ‘आरक्षण हटाओ’ आंदोलन चालवले जात आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान काही विकृत व जातीवादी मानसिकतेच्या तरुणांनी उघडपणे जातिवादाचे प्रदर्शन मांडल्याचे समोर आले आहे. या आंदोलनात तरुणांच्या एका गटाने “ब्राह्मणवाद जिंदाबाद”, “ठाकूरवाद जिंदाबाद” अशा विशिष्ट जातींचे उदात्तीकरण करणाऱ्या घोषणा दिल्या. (Prakash Ambedkar)

Also Read : नागपूर आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा; राजेंद्र पातोडे यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

भारतीय राज्यघटनेने मागास, वंचित आणि शोषित घटकांना सन्मानाने जगण्यासाठी आणि प्रतिनिधित्वासाठी आरक्षण ही सामाजिक न्यायाची संकल्पना दिली आहे.

परंतु, आरक्षणाला विरोध करण्याच्या नावाखाली अशा प्रकारे विशिष्ट जातींचा हुंकार भरणे आणि घोषणाबाजी करणे, यावरून हे आंदोलन केवळ आरक्षणाविरोधात नसून ते जातीव्यवस्था बळकट करण्यासाठीचा ‘जातीवादी मेळावा’ बनले आहे, असा आरोप आता सर्वस्तरातून होत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्विटनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


       
Tags: BrahminismcasteismMaharashtraPoliticalPrakash AmbedkarreservationReservation AbolitionReservation ProtestSCST ReservationVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

नागपूर आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा; राजेंद्र पातोडे यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

Next Post

मुंबईत घुमणार ‘संविधान सन्मान महासभे’चा आवाज!

Next Post
मुंबईत घुमणार 'संविधान सन्मान महासभे'चा आवाज!

मुंबईत घुमणार 'संविधान सन्मान महासभे'चा आवाज!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home