समान नागरी कायद्या वरून एड. प्रकाश आंबेडकरांचे भाजप आणि आरएसएस ला आव्हान!
नवीन संसद भवनाच्या उद्घाटना पूर्वी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता कायद्यावर चर्चा घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. विधी आयोगाने ही त्यावर सूचना मागितल्या आहेत. मात्र ज्या कायद्याबाबत चर्चा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या कायद्याचा मसुदा च तयार नाही. आधी तो जाहीर करा असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस ला) केलेले आहे.
अकोला येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधी आयोगाने समान नागरी कायद्यावर चर्चा करण्यासंदर्भात केलेल्या आव्हाना बाबत त्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. कायद्याचा मसुदाच तयार नाही. तर चर्चा कशावर करावी प्रतिक्रिया कशावर द्याव्यात? असा प्रति प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कायद्याबाबत घाई घाईत निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे सध्या भाजपाकडे निवडणूक साठी कोणताही मुद्दा उरला नाही. त्यामुळे समान नागरी कायद्यावर चर्चा सुरू करण्यात आली आहे.
हिंदू समाजात भांडणे लावण्याचा प्रकार सध्या हिंदूचे ठेकेदार म्हणविणाऱ्या आरएसएस कडून सुरू असल्याचा आरोपही एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला. ज्या कायद्यावर केंद्र सरकार चर्चा घडवून आणू पहाते आहे. त्या कायद्याचा मसुदा आधी प्रसिद्ध करावा! असे आव्हान त्यांनी दिले.
समान नागरी कायद्या वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान हे सध्या बावरची/ आचारी च्या भूमिकेत वागत असल्याचे सांगितले. मात्र त्यांना घरात काय काय आहे? गॅस आहे? किंवा नाही? धान्य आहे? किंवा नाही?याचीच माहिती नाही, आणि ते स्वयंपाक करायला निघाले आहेत. त्यांचे घरच खाली असल्याचे सांगून एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिला संदर्भ!
अकोल्याच्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की,
संविधानावरील चर्चेत समान नागरी कायद्याबाबत बाबासाहेबांनी जबाबदारी घेतली होती. तेव्हा हिंदूंच्या विवाह पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. हिंदू समाजातील विवाह पद्धती हा गुंतागुंतीचा विषय परंतु हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. विविध राजकीय पक्षात व संघटना मध्ये याबाबत त्यावेळी एकमत झालेले नव्हते. समान नागरी कायदा करायचा म्हणजे सध्या प्रचलित असलेल्या हिंदू विवाह पद्धती पैकी एक पद्धती स्वीकारावी लागेल. हिंदुंमध्ये विवाहाच्या दोन पद्धती आहेत. विवाह हा प्रत्येक समाजाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. हिंदू समाजाचाही विवाह हा विषय जिव्हाळ्याचा विषय आहे. हिंदू विवाहाच्या दोन पद्धती आहेत.
१) ब्राह्मण आणि क्षत्रिया चे होम आणि सात फेरे/सप्तपदी घेऊन होणारा विवाह.
२) हिंदू समाजातील शूद्र आणि अतिशूद्र, इतरांचा अंतरपाट धरून होणारा विवाह.
या दोन विवाह पद्धतीपैकी कोणती एक विवाह पद्धती स्वीकार करणार आहे? ते आधी भाजप व आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान एडवोकेट प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय नेते वंचित बहुजन आघाडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दिलेले आहे.
(अकोला पत्रकार परिषदेतील दिनांक ८ जुलै 2023, संकलन प्राचार्य म.ना.कांबळे)