औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाने व प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.अरुंधती ताई शिरसाठ यांच्या आदेशाने वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे शहरामधे प्रत्येक वॉर्ड मध्ये ठीक ठिकाणी माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामधे प्रामुख्याने महिलांचा समावेश होता.
वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्षा वंदना जाधव यांच्या मार्गदर्शनाने महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संघटनेने आपापल्या वॉर्ड मध्ये रमाई जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षाच्या वतीने आव्हान करण्यात आले की राज्य सरकारने रमाई जयंती निमित्त सुट्टी जाहीर करून , यापुढे प्रत्येक शाळेमध्ये रमाई जयंती साजरी करण्यात यावी असे आदेश राज्य सरकारने काढावे असे आवाहन शहर अध्यक्षा वंदना जाधव यांनी केले.
कुतुबपूरा येथे शहर आघाडीच्या प्रवक्ता संगीता अंभोरे यांनी त्याग मूर्ती रमाई यांच्या बद्दल मोलाचे मार्गदर्शन करून महिला व लहान मुलींच्या स्पर्धा घेत महिलांना आणि मुलींना शितल बनकर, मृणाल शिंदे, मंगल देहरे, सोनवणे आणि कुतुबपुरा महिला मंडळ यांनी प्रोत्साहित केले.
विश्रांती नगर, भरत नगर येथे किशोर निकाळजे ,रामदास वाघमारे, तसेच सोनावणे आणि सुलोचना साबळे यांनी रमाई जयंती निमित्त फळ वाटप करून, भोजन दान ठेवले. महाडा कॉलनी हर्सूल येथे मीना ताई जाधव तसेच वंदना जाधव यांच्या वतीने बौद्ध विहार सुभेदारी रामजी नगर,तसेच पैठण गेट येथे सुनीता कोतकर यांच्या वतीने रमाई जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.