महापरिनिर्वाण अभिवादन करण्यात रेल्वेने निर्माण केलेला अडथळा दूर झाला, वंचित बहुजन युवा आघाडीने संघर्षाचा पवित्रा घेत आंदोलन करण्याचा इशारा देणारे ईमेल कालच रेल्वे अधिकारी ह्यांना पाठवले होते. त्यावर आज मुंबई मध्ये रेल्वे अधिकारी ह्यांच्या बैठकीत ह्या गंभीर विषयांवर चर्चा होवून ५ आणि ६ डिसेंबरचा ब्लॉक रद्द न करता रद्द केलेल्या ट्रेन्स आणि विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्लॉक असेल मात्र आंबेडकरी अनुयायी ह्याना कुठल्याही पध्दतीने त्रास होणार नाही, त्यामुळे अमरावती, गोंदिया, सेवाग्राम तसेच १४ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई येथील रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार ह्यांनी दिली आहे. त्याच बरोबर १४ विशेष रेल्वे देखील त्या दिवशी सोडणार असल्याने आंबेडकरी अनुयायांना गैरसोय होणार नाही, हे देखील कळविले आहे. ह्या ट्रेन वेळेत चालविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे महापरिनिर्वाण दिनाच्या दिवसाचे गांभिर्य न जपणारे ते अधिकारी कोण आहेत आणि सहा डिसेंबर च्या पूर्वसंध्येला हा मेगाब्लॉक का घेण्यात आला होता, ह्याची चौकशी करण्यात यावी ह्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार वंचित युवा आघाडीने केला आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101