Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कायदा म्हणजे कायदाच असतो! पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांचे प्रश्नचिन्ह‎

mosami kewat by mosami kewat
August 3, 2025
in बातमी
0
कायदा म्हणजे कायदाच असतो! पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांचे प्रश्नचिन्ह‎
       

पुणे : औरंगाबादमधील एका पीडित महिलेला मदत केल्याप्रकरणी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्यांना कोथरूड पोलिसांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता अटक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने संबंधित दोषी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पतीच्या त्रासाला कंटाळून संभाजीनगर येथून पुण्यात आलेल्या एका विवाहित महिलेला तीन सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. त्यांनी तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये दाखल केले आणि स्वावलंबी होण्यासाठी मदत करत होत्या.

मात्र, या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक संभाजीनगर येथील निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचा आरोप आहे. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांच्या मदतीने या तीन कार्यकर्त्यांना मध्यरात्री त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.

कायदा म्हणजे कायदाच असतो!

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढे म्हटले की, कोथरूड पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय या महिलांना अटक केले आणि पोलीस ठाण्यात नेले. या महिलांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी टाळाटाळ केली. तसेच, मध्यरात्री घरात घुसून जातीय आणि स्त्रीद्वेषी शिवीगाळ केल्याचा आरोपही पीडित महिलांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून तातडीने एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले.‎

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत सांगितले की, कोणत्याही संज्ञेय गुन्ह्याची माहिती मिळाल्यास एफआयआर नोंदवणे पोलिसांना बंधनकारक आहे. कायदा म्हणजे कायदाच असतो! असे त्यांनी ठामपणे सांगितले.

‎या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्हा समित्यांनी आंदोलन केले आहे. जर पोलिसांनी लवकरच एफआयआर दाखल केला नाही, तर मोठ्या संख्येने एसपी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.


       
Tags: crimeFIRLowpolicePrakash Ambedkarpune
Previous Post

चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक

Next Post

न्यायाची ऐशी की तैशी !

Next Post
न्यायाची ऐशी की तैशी !

न्यायाची ऐशी की तैशी !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर...

Read moreDetails
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home