Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक

mosami kewat by mosami kewat
August 3, 2025
in बातमी
0
चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक

चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक

जळगाव : महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. जळगाव पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर म्होरक्याला तामिळनाडूतून अटक केली आहे. या कारवाईमध्ये सुमारे ६५ कोटी रुपयांचे एम्फेटामाइन नावाचे सिंथेटिक ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
‎
‎अंमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय तस्करीचा मार्ग उघडकीस

‎चाळीसगाव पोलिसांनी २४ जुलै रोजी रात्रीच्या नियमित नाकाबंदीदरम्यान एका संशयित कारला (DL 09, CB 7771) बोढरे फाट्याजवळ अडवले. तपासणी केल्यावर कारच्या डिक्कीमध्ये एका सुटकेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडले. पोलिसांनी तात्काळ कार चालक अब्दुल आसिम अब्दुल आला सय्यद (वय ४८, रा. न्यू फ्रेंड्स कॉलनी, दिल्ली) याला अटक केली.
‎
‎पोलिसांनी जप्त केलेल्या या अंमली पदार्थाची किंमत सुमारे ६४ कोटी ९८ लाख रुपये असून, ते एम्फेटामाइन नावाचे सिंथेटिक ड्रग्ज असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अधिक तपास केला असता, हा अंमली पदार्थांचा साठा दिल्लीतून हरियाणा, मध्यप्रदेशमार्गे महाराष्ट्रातील चोपडा-चाळीसगाव- औरंगाबाद असा प्रवास करून तामिळनाडू आणि तिथून श्रीलंकेत पाठवला जात होता, अशी माहिती उघड झाली आहे.
‎
‎तमिळनाडूतील मुख्य सूत्रधार अटकेत
‎
‎या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चार विशेष पथके दिल्ली, बंगळूर, मध्यप्रदेश आणि तामिळनाडूला पाठवली. या पथकांनी सतत तपास करून तामिळनाडूमध्ये लपून बसलेल्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला शोधून काढले.
‎
‎पोलिसांनी २८ जुलै रोजी तामिळनाडूतील नागापट्टम येथून महालिंगम नटराजन (वय ६२, रा. विंलुदामावडी, नागापट्टम, तामिळनाडू) याला ताब्यात घेतले. त्याला चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे एक मोठे रॅकेट उध्वस्त झाले आहे.

Tags: crimecriminalDrug traffickingjalgaonpolice
Previous Post

पुणे पोलिसांकडून सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ; ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

Next Post

कायदा म्हणजे कायदाच असतो! पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांचे प्रश्नचिन्ह‎

Next Post
कायदा म्हणजे कायदाच असतो! पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांचे प्रश्नचिन्ह‎

कायदा म्हणजे कायदाच असतो! पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांचे प्रश्नचिन्ह‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन
बातमी

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

by mosami kewat
September 28, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देत औरंगाबाद पश्चिम जिल्ह्यांतर्गत गंगापूर तालुक्यातील हरिप्रसाद नगर, जोगेश्वरी येथे वंचित बहुजन...

Read moreDetails
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

September 28, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

September 28, 2026
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home