Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद

mosami kewat by mosami kewat
March 13, 2026
in बातमी, सामाजिक
0
पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद
       

पुणे : गॅस सिलिंडर टंचाईमुळे खानावळींसह ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांवर परिणाम देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर जाणवू लागला आहे. गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे पुण्यातील खानावळी, छोटे हॉटेल्स आणि क्लाउड किचन अडचणीत सापडले असून त्याचा फटका ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांनाही बसू लागला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि काळ्या बाजारात त्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक लहान हॉटेल्स व क्लाउड किचनना स्वयंपाक सुरू ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुण्यासह देशभरातील काही ठिकाणी ऑनलाइन ऑर्डर स्वीकारणे तात्पुरते बंद करण्याचा निर्णय अनेक व्यावसायिकांनी घेतला आहे. )Pune Food Supply Hit by LPG Shortage)

पुणे हे शिक्षण आणि उद्योग क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि आयटी क्षेत्रातील कर्मचारी वास्तव्यास आहेत. घरापासून दूर राहणाऱ्या या वर्गासाठी खानावळी आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरी हा प्रमुख पर्याय असतो. मात्र, खानावळी बंद झाल्यामुळे अनेकांनी ऑनलाइन जेवण मागवण्याकडे वळले असताना, आता त्या सेवांवरही परिणाम होत असल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. (Pune Food Supply Hit by LPG Shortage)

याचा परिणाम फक्त ग्राहकांवरच नव्हे, तर फूड डिलिव्हरी करणाऱ्या पार्टनर्सवरही होत आहे. ऑर्डर्स कमी झाल्याने त्यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. गॅस सिलिंडर टंचाईमुळे पुण्यातील फूड व्यवसायाची संपूर्ण साखळीच विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


       
Tags: Gas cylinderIran Israel WarLPGPune Food Supply Hit by LPG Shortage
Previous Post

परभणी: १० दिवसांचे श्रामनेर आणि बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी; भन्ते पी. धम्मानंदजी यांची उपस्थिती 

Next Post

इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती

Next Post
इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती

इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बातमी

घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

by mosami kewat
April 2, 2026
0

अहमदनगर : घारगाव येथे विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळावर झालेल्या भ्याड हल्ल्याने राज्यातील लोककलावंतांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला...

Read moreDetails
ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

April 2, 2026
Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

April 2, 2026
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

April 2, 2026
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

April 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home