अकोला :केंद्रीय अर्थसंकल्पात सूक्ष्म आर्थिक स्तरावर सर्वसमावेशक कल्याणावर लक्ष केंद्रित केल्याचा आव आणून सरकारने ‘बेचो इंडिया’ यासाठी अर्थसंकल्पात तरतुदी केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे.
महागाई, बेरोजगारी,कृषी, आरोग्य, शिक्षण ह्यांना फाट्यावर मारणारा अर्थसंकल्प मागचा अर्थसंकलप होता.आणखी सरकारी उपक्रम विकायला काढले जाणार असून ह्यापूर्वी भारतावर मार्च २०१४ मध्ये देशावर ५४.११ लाख कोटी कर्ज होते जे आज रोजी १०० लाख कोटी आहे. कुठलाही सार्वजनिक उपक्रम किंवा योजना न राबवता सरकारने देश कर्जबाजारी केला असून अदानी प्रमाणे अनेक बाबींवर आकड्यांचा खेळ करण्यात आला आहे.ट्रिलियन डॉलर च्या हवाई बाता मारल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
चार दशकांनंतर जीडीपीची एवढी मोठी घसरण झाली आहे. बेरोजगारी टोकाला जाऊन पोहोचली आहे. विकासाचे आधारस्तंभ, मागणी-पुरवठा साखळी, गुंतवणूक ठप्प झालं आहे. मंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे ताकद नाही. अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळता न येणं ही एकमेव चूक नाही, तर भ्रष्टाचार संपवू शकले नाही. उलट राजकीय पक्षाचे भ्रष्ट्राचार आपल्या चरम सीमेवर पोहचला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.