मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच विधानसभेत पारित केलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज मुंबई पत्रकार संघात एका निषेध बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हे विधेयक ‘जन (अ) सुरक्षा विधेयक’ असल्याची तीव्र भावना व्यक्त करत, त्याचा निषेध करण्यासाठी आणि आगामी काळात या विरोधात कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी ही बैठक पार पडली.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार कपिल पाटील यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. (Maharashtra Public Safety Bill)
यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी या विधेयकाबाबत आपली चिंता आणि विरोध नोंदवला. या बैठकीत विधेयकातील तरतुदींवर सखोल चर्चा करण्यात आली आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यावर भर देण्यात आला.
संगमनेर नगरपालिका निवडणूक 2025 साठी वंचित बहुजन आघाडी “संगमनेर सेवा समिती” सोबत काम करणार!
अहमदनगर : संगमनेर नगरपालिकेची निवडणूक तब्बल 9 वर्षानंतर होत आहेत. वंचित बहुजन आघाडी संगमनेरमध्ये प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीच्या रिंगणात...
Read moreDetails






