मुंबई : १९९६ पर्यंत वॉच अँड वॉर्ड सिक्युरिटी ही संसदेची सुरक्षा व्यवस्था पाहत होती. ही सुरक्षा व्यवस्था ही लोकसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येत होती. मात्र त्यानंतर या सुरक्षा व्यवस्थेचा स्टाफ कमी करण्यात आला आणि दिल्ली पोलिसांच्या स्टाफ चा अधिक भरणा करण्यात आला. दिल्ली पोलिस थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येते. त्यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी बोलायला हवं असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. संसदेच्या घुसखोरी संबधित प्रश्नावर उत्तर देताना मुंबई येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हे सांगितले आहे.
२५ डिसेंबर रोजी नागपूर येथे स्त्री मुक्ती दिन परिषद वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होती.
नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.