Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रकाश आंबेडकरांचा मोदी-आरएसएसवर घणाघात; ट्विटमधील संवाद चर्चेत, नागपूरात २३ मार्चला आंदोलनाची हाक

mosami kewat by mosami kewat
March 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
प्रकाश आंबेडकरांचा मोदी-आरएसएसवर घणाघात; ट्विटमधील संवाद चर्चेत, नागपूरात २३ मार्चला आंदोलनाची हाक

प्रकाश आंबेडकरांचा मोदी-आरएसएसवर घणाघात; ट्विटमधील संवाद चर्चेत, नागपूरात २३ मार्चला आंदोलनाची हाक

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि आरएसएस (Rashtriya Swayamsevak Sangh) यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत केलेल्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

ॲड. आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यंगात्मक शैलीत मोदी आणि आरएसएस यांच्यातील संवाद मांडत केंद्र सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी मांडलेला संवाद असा आहे –

“मोदी – मी अमेरिकेचा गुलाम बनेन!
आरएसएस – बना!

मोदी – मी अमेरिकेच्या तालावर मुजरा करीन!
आरएसएस – करा!

मोदी – मी अमेरिकेच्या सांगण्यावरून सोर्स कोड नसलेले महागडे राफेल खरेदी करीन!
आरएसएस – खरेदी करा!

मोदी – मी अमेरिकेसमोर नतमस्तक होईन, देश विकून टाकीन, लोकांना फसवीन; पण तुम्ही फक्त देशप्रेमी असल्याचा ढोंग करत राहा आणि काही बोलू नका!

आरएसएस – काही अडचण नाही. आम्ही यात माहिर आहोत!”

या संवादाच्या माध्यमातून आंबेडकर यांनी मोदी सरकार अमेरिकेच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच आरएसएस या घडामोडींवर मौन बाळगून अप्रत्यक्ष पाठिंबा देत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. (Prakash Ambedkar)

भूतकाळाचा संदर्भ देत त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील आरएसएसच्या (RSS) भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, “देश पुन्हा गुलामगिरीकडे ढकलला जात आहे,” असा आरोप करत त्यांनी ही परिस्थिती “देशद्रोही कृत्य” असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर २३ मार्च रोजी नागपूर (Nagpur) येथे आरएसएसविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. (Prakash Ambedkar)

या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, आगामी काळात या मुद्द्यावरून राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Tags: American InfluenceAnti-RSS Movementindian politicsMarch 23 ProtestModi Government PoliciesModi-RSS Criticismnarendra modiNational PoliticsPolitical AccountabilityPolitical AllegationsPrakash AmbedkarProtest in NagpurRashtriya Swayamsevak Sangh (RSS)
Previous Post

बदर समितीचा ‘अ ब क ड’ अहवाल सादरीकरणाचा फार्स अनुसूचित जातींची फसवणूक!

Next Post

वंचित बहुजन आघाडी आक्रमक: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; दोषी डॉक्टरांवर कारवाईसाठी आरोग्य प्रशासनाला विचारला जाब!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी आक्रमक: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; दोषी डॉक्टरांवर कारवाईसाठी आरोग्य प्रशासनाला विचारला जाब!
बातमी

वंचित बहुजन आघाडी आक्रमक: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; दोषी डॉक्टरांवर कारवाईसाठी आरोग्य प्रशासनाला विचारला जाब!

by mosami kewat
March 17, 2026
0

परभणी : चुडावा (ता. पूर्णा) येथील डॉ. स्वाती गोविंद सोळंके यांच्या अक्षम्य वैद्यकीय निष्काळजीपणामुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी उपाध्यक्ष राजरत्न...

Read moreDetails
प्रकाश आंबेडकरांचा मोदी-आरएसएसवर घणाघात; ट्विटमधील संवाद चर्चेत, नागपूरात २३ मार्चला आंदोलनाची हाक

प्रकाश आंबेडकरांचा मोदी-आरएसएसवर घणाघात; ट्विटमधील संवाद चर्चेत, नागपूरात २३ मार्चला आंदोलनाची हाक

March 17, 2026
बदर समितीचा 'अ ब क ड' अहवाल सादरीकरणाचा फार्स अनुसूचित जातींची फसवणूक!

बदर समितीचा ‘अ ब क ड’ अहवाल सादरीकरणाचा फार्स अनुसूचित जातींची फसवणूक!

March 17, 2026
राहाता तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीचा महिला मेळावा उत्साहात; मोठ्या संख्येने पक्षप्रवेश

राहाता तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीचा महिला मेळावा उत्साहात; मोठ्या संख्येने पक्षप्रवेश

March 17, 2026
नालासोपाऱ्यात ‘दावत-ए-इफ्तार’ उत्साहात; वंचित बहुजन आघाडी व स्वराज्य प्रतिष्ठानचा सामाजिक सलोख्याचा पुढाकार

नालासोपाऱ्यात ‘दावत-ए-इफ्तार’ उत्साहात; वंचित बहुजन आघाडी व स्वराज्य प्रतिष्ठानचा सामाजिक सलोख्याचा पुढाकार

March 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home