मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (मुंबई ) येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता या सभेला लाखोंचा जनसागर लोटणार असल्याचे दिसत आहे.
मुंबई येथे होणाऱ्या या सभेला येण्यासाठी नागरिकांना रेल्वे आरक्षण मिळत नाही. त्याचबरोबर एस. टी महामंडळाच्या बसेस कमी असल्याने लोकांची गैरसोय होत आहे. तरीही ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लोक स्वतंत्र खाजगी वाहने करून सभेला येणार आहेत.
या सभेसाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ते या सभेला उपस्थित राहतील का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर सध्याच्या राज्यातील मराठा आणि ओबीसी यांच्यातील आरक्षणाच्या संघर्षावर आणि राज्यातील व देशातील राजकारणावर ॲड. प्रकाश आंबेडकर काय बोलतील ? याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.