औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात कार्यकर्त्यांकडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानल्यात आले आहे. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याबद्दल हे बॅनर लावण्यात आले आहेत.
बॅनरवर, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तिवादामुळे सुप्रीम कोर्टात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे, असे नमूद करत त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच, हा लढा अजून संपलेला नाही, जोपर्यंत आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील! असा संदेशही या बॅनरवर लिहिलेला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रस्त्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. या बॅनरबाजीमुळे सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा शहरात सुरू झाली आहे.
काय आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण?
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर एका आठवड्यात मृत्यूचे संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यावर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
30 जुलै रोजी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याच आदेशान्वये परभणीच्या नवा मोंढा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि सोमनाथचे कुटुंब काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे (CID) वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेत. त्या अनुषंगाने अगोदर या खुनाच्या प्रकरणात कोण पोलीस दोषी आहेत त्याची जबाबदारी निश्चित करून मग नावे या गुन्ह्यात समाविष्ट करावीत असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.
ICC Women's World Cup 2025 : भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी नवी मुंबईतील...
Read moreDetails 
			 
					

 
							




