मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी मोदींना “द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर” असे संबोधले.
आंबेडकर म्हणाले की, “सनातन धर्म हा छळछावणी व अस्पृश्यतेचे दुसरे नाव आहे. तो दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलांना पुन्हा गुलाम बनविण्याची मानसिकता रुजवतो. मोदी हे या व्यवस्थेचे राजा आहेत.”
यापूर्वी देखील आंबेडकरांनी मोदी सरकारच्या धोरणांवर आणि वैदिक हिंदुत्ववादी विचारसरणीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.