Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; ‘या’ जिल्ह्यांना पुराचा फटका

mosami kewat by mosami kewat
September 16, 2025
in बातमी
0
महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका

Maharashtra Monsoon : मुंबई, पुणे, आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पुण्यात मुसळधार पाऊसाने झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ढगफुटीसदृश्य पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आजही राज्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

प्रमुख जिल्ह्यांची स्थिती:

  • पुणे आणि रायगड: या दोन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
  • बीड: येथे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून बचावकार्य सुरू आहे.
  • जालना: घनसावंगी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
  • लातूर: तेरणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
  • मुंबई शहर आणि उपनगरे: मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे.
  • रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग: मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
  • सांगली, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि नागपूर: या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कायम असून पुढील दोन दिवस नागपूरमध्ये पावसाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाचा अंदाज:

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, पुणे घाटमाथा आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, बीड, बुलडाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मान्सून बुधवारपर्यंत राजस्थान, गुजरात आणि पंजाबच्या काही भागातून माघार घेण्याचे संकेत आहेत. पूर्व विदर्भासह आजूबाजूच्या भागात सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Tags: heavy rainfallIMD orange alertMaharashtramaharashtra monsoonMarathwada floodsMonsoonPune rainsRainfallvbaforindia
Previous Post

मोदी “द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Next Post

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

Next Post
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home