मुंबई : लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाची मागणी करण्यात आली आहे. शिवजीपार्कवर स्मारक करावे का असा प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे मत मांडले.
“माझा विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहिलं पाहिजे. त्याला स्मशानभूमी करू नये. बाजूला एक स्मशानभूमी चांगली आहे, मोठी आहे.” असे बाळासाहेब आंबेडकर यावेळी म्हणाले.
“ते खेळाचं मैदान आहे. अनेक खेळाडू त्या मैदानावर घडलेले आहेत. अनेक शाळांचे, क्लबचे मॅचेस तिथे होतात. व्यक्तींचं स्मारक करायचं असेल तर अनेक ठिकाणी बऱ्याच जागा आहेत. त्यासाठी खेळाच्या मैदानावर अतिक्रमण करावं असं मला वाटत नाही.” असेही ते म्हणाले.
“माणसांची तत्व असतात, त्यांचा सन्मान करावा.”
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर ट्रोलिंग करण्यावर त्यांनी आक्षेप घेतला. ते चुकीचे आहे असे ते म्हणाले.
लता मंगेशकर यांनी बाबासाहेबांवर गाणं म्हणायला नकार दिल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “नेहरूंवरही गायले नाही, सरदार पटेलांवरही गायले नाही. काही माणसांचे तत्व असतात, त्याला honour केलं पाहिजे”
“ट्रोलिंग करणे चुकीचे आहे. जे बोलायचं ते जिवंतपणी बोलायला हवं होतं. एकदा माणूस गेला की त्याचा आदरच झाला पाहिजे असं मला वाटतं.” असेही ते म्हणाले.