Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉम्प्राईज्ड झाले आहेत का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे देशव्यापी आंदोलनासाठी काँग्रेस नेतृत्वाला पत्र!

mosami kewat by mosami kewat
February 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉम्प्राईज्ड झाले आहेत का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे देशव्यापी आंदोलनासाठी काँग्रेस नेतृत्वाला पत्र!
       

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉम्प्राईज्ड झाले आहेत का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीबाबत पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी करत काँग्रेस नेतृत्वाला देशव्यापी निषेध आंदोलन उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहले आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. 

या पत्रात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी इपस्टिन फाईल, अमेरिका व्यापारी करार, डोकलाम प्रश्न, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय घडामोडींचा उल्लेख करत पंतप्रधानांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशाच्या सार्वभौमत्व, धोरणात्मक स्वायत्तता आणि राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका आणि सार्वजनिक उत्तरदायित्व असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. (Prakash ambedkar)

संसदेसोबत जनआंदोलनाचीही गरज :

आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेसकडून संसदेत हे प्रश्न उपस्थित केले जात असले, तरी ते थेट जनतेपर्यंत पोहोचवणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे देशभरात लोकांच्या सहभागातून आंदोलन उभारण्याची आवश्यकता असल्याचा त्यांनी आग्रह धरला आहे.

विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन :

प्रस्तावित आंदोलनासाठी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि इतर भाजपविरोधी समान विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, भारतीय आदिवासी पक्ष, गोंडवाना गणतंत्र पक्ष, आझाद समाज पक्ष, अपना दल (कमेरावादी) तसेच अन्य संघटनांचा सहभाग असावा, असे त्यांनी पत्रात सुचवले आहे. (Prakash ambedkar)

सामाजिक संघटनांनाही सहभागी करण्याचा प्रस्ताव :

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच बौद्ध, मुस्लिम आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनाही या आंदोलनात सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव ॲड. प्रकाश आंबेडकर  यांनी मांडला आहे. अशा संघटनांची ताकद आंदोलन अधिक प्रभावी करू शकते, असेही त्यांनी नमूद केले. (Prakash ambedkar)

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण :

या पत्रामुळे विरोधी पक्षांच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात असून विविध पक्षांची पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


       
Tags: americabjpDonald TrumpEpstein fileMaharashtranarendra modiPoliticalpoliticsPrakash AmbedkarRahul GandhiVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककर त्रस्त; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन!

Next Post

चेंबूरमध्ये वंचित बहुजन आघाडी व शिल्ड फाउंडेशनतर्फे उद्या भव्य ‘मोफत नेत्रचिकित्सा शिबिर’

Next Post
चेंबूरमध्ये वंचित बहुजन आघाडी व शिल्ड फाउंडेशनतर्फे उद्या भव्य ‘मोफत नेत्रचिकित्सा शिबिर’

चेंबूरमध्ये वंचित बहुजन आघाडी व शिल्ड फाउंडेशनतर्फे उद्या भव्य 'मोफत नेत्रचिकित्सा शिबिर'

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हाताने मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जंतर-मंतरवर एल्गार !
बातमी

हाताने मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जंतर-मंतरवर एल्गार !

by mosami kewat
March 27, 2026
0

नवी दिल्ली : देशात बेकायदेशीर ठरवण्यात आलेल्या हाताने मैला साफ करण्याच्या प्रथेविरोधात आणि गटार व सेप्टिक टँकमध्ये होणाऱ्या मृत्यूंच्या निषेधार्थ...

Read moreDetails
धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज

धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज

March 27, 2026
Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव

Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव

March 27, 2026
BCCIचा बिग प्लॅन; कोहली-रोहित पुन्हा मैदानात, वनडेत रंगणार लढत

BCCIचा बिग प्लॅन; कोहली-रोहित पुन्हा मैदानात, वनडेत रंगणार लढत

March 27, 2026
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home