Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

mosami kewat by mosami kewat
February 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!
       
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल ट्विट करत जाहीर केले आहे की, भारत रशिया कडून तेल खरेदी करणार नाही, त्याबदल्यात अमेरिकेकडून तेल खरेदी करेल तसेच अमेरिकेकडून शेतमालाची खरेदी सुद्धा भारत करेल त्या बदल्यात टेरिफ कर कमी करून तो 25 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. 

यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. भारत सरकार अमेरिकेच्या दबावापुढे शरण गेली आहे का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Prakash ambedkar)

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटर  पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना थेट प्रश्न विचारले आहेत. पाकिस्तानसोबत झालेल्या शस्त्र संधीमध्ये (सीजफायर) डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा जो दावा केला आहे, तो भारत सरकार मान्य करत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

तसेच ट्रम्प यांनी केलेल्या आणखी एका दाव्याचा उल्लेख करत आंबेडकर यांनी स्पष्टता मागितली आहे. भारताने रशियन तेल खरेदी थांबवून अमेरिकेकडून आणि संभाव्यतः व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. हा दावा खरा आहे का? असे प्रश्न ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. तसेच भारत खरोखरच रशियन तेलाऐवजी अधिक महाग तेल अमेरिकेकडून आयात करणार आहे का?, असा सवाल त्यांनी केला. (Prakash ambedkar)

याशिवाय भारत अधिक प्रमाणात अमेरिकन कृषी उत्पादने आयात करणार आहे का, याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. असे झाल्यास भारतीय शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक दबाव येईल आणि देशातील एकूण कार्यबलाच्या सुमारे ४० टक्के असलेल्या शेतकरी वर्गाची उपजीविका धोक्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. (Prakash ambedkar)

या कराराला ॲड. आंबेडकर यांनी भारतविरोधी आणि अमेरिकाधार्जिणा असे संबोधले आहे. भारत आता अमेरिकेच्या तालावर नाचत आहे का? असा थेट सवाल करत त्यांनी केंद्र सरकारकडून जाहीर उत्तराची मागणी केली आहे.

Tags: donald trampEconomicsMaharashtramoneynarendra modiPoliticalpolticsPrakash AmbedkarrateShare market
Previous Post

११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?

Next Post

अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

Next Post
अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद
बातमी

Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद

by mosami kewat
March 14, 2026
0

औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर...

Read moreDetails
मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 14, 2026
औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

March 14, 2026
अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

March 14, 2026
सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

March 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home