मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर दिल्लीतील भेटीगाठींच्या मुद्द्यावरून थेट हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १६० जागा जिंकून देण्याची ग्वाही देणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींमुळे आपली राहुल गांधींशी भेट झाली, असा दावा शरद पवार यांनी केला होता.
यावर, “खोटं बोलण्यालाही एक मर्यादा असते, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर सडकून टीका केली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत x ( ट्विटर) म्हटले आहे की, शरद पवार यांना राहुल गांधींसोबत त्यांची भेट घडवून आणणाऱ्या त्या दोन लोकांची नावे आठवत नाहीत, हे हास्यास्पद आहे. राहुल विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांच्या भेटीला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते.
त्यामुळे ज्या दिवशी शरद पवार राहुल गांधींना भेटले, त्या दिवसाची रजिस्टर नोंद तपासल्यास त्यांच्यासोबत कोण होतं, हे सहज स्पष्ट होऊ शकतं, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, तुम्ही सामान्य माणसाला फसवू शकता, पण राजकीय कार्यकर्त्यांना फसवणं शक्य नाही.
या टीकेमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आधीच सुरू असलेल्या धुसफुशीत आणखी भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून अनेक नेत्यांमध्ये मतभेद समोर येत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिएतनाममधील व्यावसायिक हितसंबंधांवर आणि व्यापार करारावर प्रश्नचिन्ह
संजीव चांदोरकरडोनाल्ड ट्रम्प, देशांनी त्यांना हव्या तशा अटींवर व्यापार करारावर सह्या कराव्यात म्हणून त्यांचे हात पिरगळत असतात. वरकरणी असे वाटेल...
Read moreDetails