Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो – प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
August 11, 2025
in बातमी
0
‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो - प्रकाश आंबेडकर

‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो - प्रकाश आंबेडकर

       

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे विरोधी पक्षांना आवाहन: ‘ ७६ लाख मतदानाच्या वाढीविरोधातील याचिकेत सहभागी व्हा’
‎
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षांना ७६ लाख मतदानाच्या वाढीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, केवळ मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, तर कोर्टातूनच आपल्याला न्याय मिळू शकतो. जर विरोधी पक्षांचा लढा खरा असेल तर त्यांनी या याचिकेत एक पक्ष म्हणून सहभागी व्हावे.
‎
‎अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, आम्ही जेव्हा विरोधी पक्षांना उच्च न्यायालयात जाऊ आणि निवडणूक आयोगाला विचारू की जर तुमच्याकडे कागदपत्रे नसतील, तर ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष कशी झाली? हे आम्हाला सांगा आणि ७६ लाख मतदान हे मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदारांनीच केले आहे का? हे विचारू, असे पत्र लिहिले होते. पण, त्यावेळी कोणीही आमच्या बाजूने उभे राहिले नाही.
‎
‎मुंबई उच्च न्यायालयाने ७६ लाख मतदानाच्या वाढीची याचिका फेटाळली असली तरी, आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या याचिकेमध्ये तरी विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
‎
‎पुढे त्यांनी म्हटले की, कोर्टाच्या माध्यमातूनच आपण निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू शकतो की, ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष कशी झाली? ते आम्हाला सांगा. या मुद्द्यावर लढा देण्यासाठी कोर्टातील सहभाग आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.


       
Tags: Election commissionmumbaiPrakash Ambedkarvote
Previous Post

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

Next Post

‎’रक्षकच भक्षक बनू नये’, पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

Next Post
‎'रक्षकच भक्षक बनू नये', पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

‎'रक्षकच भक्षक बनू नये', पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही!  धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान
बातमी

आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही!  धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान

by mosami kewat
March 23, 2026
0

नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयावर आज विशाल संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश...

Read moreDetails
भारताचे सार्वभौमत्व गमावलेले संघाचे मोदी!

भारताचे सार्वभौमत्व गमावलेले संघाचे मोदी!

March 23, 2026
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-३

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-३

March 23, 2026
आरएसएस मुख्यालय घेराव ; ॲड. प्रकाश आंबेडकर ने उठाए राफेल और विदेश नीति पर बड़े सवाल

आरएसएस मुख्यालय घेराव ; ॲड. प्रकाश आंबेडकर ने उठाए राफेल और विदेश नीति पर बड़े सवाल

March 23, 2026
नागपुरात 23 मार्चला आरएसएस मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचा शांततापूर्ण मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवालांचा भडिमार

नागपुरात 23 मार्चला आरएसएस मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचा शांततापूर्ण मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवालांचा भडिमार

March 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home