Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हा शिस्तीचा नाही, जाती-आधारित भेदभावाचा प्रकार आहे! – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप

mosami kewat by mosami kewat
October 18, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
हा शिस्तीचा नाही, जाती-आधारित भेदभावाचा प्रकार आहे! – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप
       

पुणे : मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एका माजी विद्यार्थ्याला नोकरीसाठी आवश्यक असलेले ‘शैक्षणिक संदर्भ पत्र’ (Education Reference Letter) देण्यास कॉलेजने नकार दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कॉलेज प्रशासनावर आणि प्राचार्यांवर ‘जाती-आधारित भेदभाव’ करून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान (Academic Sabotage) केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नेमका काय आहे प्रकार?

प्रेम बिरहाडे नावाच्या या विद्यार्थ्याला लंडन येथील हिथ्रो विमानतळावर प्रतिष्ठित नोकरी मिळाली होती, पण कॉलेजने ‘शैक्षणिक संदर्भ पत्र’ (एम्प्लॉयमेंट रेफरन्स) देण्यास नकार दिल्याने त्याला ती नोकरी गमवावी लागल्याचे वृत्त आहे.

प्राचार्यांचे सोशल मीडियावर स्पष्टीकरण

मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पत्र पोस्ट करून या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रेम बिरहाडे या विद्यार्थ्याला त्याच्या “विद्यार्थी म्हणून असलेल्या कार्यकाळात असमाधानकारक वर्तन आणि शिस्तभंगाच्या नोंदीमुळे” नोकरीसाठीचे ‘शैक्षणिक संदर्भ पत्र’ देण्यात आले नाही.

प्राचार्यांच्या स्पष्टीकरणातील विसंगतीवर प्रश्नचिन्ह –

प्राचार्यांच्या याच पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, प्रेम बिरहाडे याला याच कॉलेजने यापूर्वी यूकेमधील प्रवेश प्रक्रियेसाठी वापरण्यासाठी तीन शिफारसपत्रे आणि एक बोनाफाईड सर्टिफिकेट (Bonafide Certificate) दिली होती.

प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप –

प्राचार्यांच्या या विसंगत भूमिकेवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. जर प्रेम बिरहाडे याचे वर्तन खरोखरच कॉलेजमध्ये असताना ‘असमाधानकारक’ होते, तर त्याच कॉलेजने त्याला एक नाही, दोन नाही, तर तीन शिफारसपत्रे आणि बोनाफाईड सर्टिफिकेट का दिले?

यांचा वापर त्याने यूकेमधील एका विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी केला. मग, अचानक असे काय बदलले? त्यावेळी तो शिफारसपत्रासाठी योग्य होता, पण आता परदेशात जागा निश्चित झाल्यानंतर कॉलेजला अचानक त्याचे चारित्र्य समस्याग्रस्त का वाटू लागले आहे?

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, सत्य हे आहे की, हा विषय शिस्तीचा नाहीये. हा विषय आहे अस्वस्थतेचा. एका दलित विद्यार्थ्याने समाजाकडून त्याच्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्याचे धाडस केल्यामुळे होणाऱ्या अस्वस्थतेचा!

कॉलेजने जे केले आहे, ते केवळ अनैतिक नाही, तर ते जाणीवपूर्वक केलेले आणि भेदभावपूर्ण कृत्य आहे! हा जातिभेदावर आधारित शैक्षणिक खोडसाळपणा आहे!

या गोष्टीला आपण तिच्या योग्य नावाने हाक मारायला हवी: जाती-आधारित भेदभाव (caste-based discrimination). आणि हे केवळ चुकीचेच नाही, तर गुन्हा आहे!

प्रेम बिरहाडे याने नंदुरबारसारख्या आदिवासी भागातून येऊन यूकेमध्ये शिक्षण घेतले आणि लंडनमध्ये नोकरी मिळवण्यापर्यंत मजल मारली. मात्र, केवळ ‘जाती-आधारित भेदभावा’मुळे त्याला नोकरी गमवावी लागली, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे.


       
Tags: caseJusticepolicepoliticsPrakash AmbedkarpuneVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, चेंबूर – विद्यार्थ्यांवरील अन्याय थांबवला!

Next Post

अमेरिका भारताचे परराष्ट्र धोरण ठरवत आहे का? ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल!

Next Post
अमेरिका भारताचे परराष्ट्र धोरण ठरवत आहे का? ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल!

अमेरिका भारताचे परराष्ट्र धोरण ठरवत आहे का? ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदेडमधील धर्मबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ
बातमी

नांदेडमधील धर्मबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ

by mosami kewat
December 20, 2025
0

नांदेड : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे....

Read moreDetails
युनेस्कोमध्ये प्रथमच बाबासाहेबांचा पुतळा; जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली

युनेस्कोमध्ये प्रथमच बाबासाहेबांचा पुतळा; जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली

December 20, 2025
मुंबईत ‘उबाठा’ आणि मनसे युतीमुळे शिवसेनेचे नुकसान – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबईत ‘उबाठा’ आणि मनसे युतीमुळे शिवसेनेचे नुकसान – ॲड. प्रकाश आंबेडकर

December 20, 2025
भिमा कोरेगाव शौर्यभूमी अभिवादन बाईक रॅलीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीची नियोजन बैठक संपन्न

भिमा कोरेगाव शौर्यभूमी अभिवादन बाईक रॅलीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीची नियोजन बैठक संपन्न

December 20, 2025
बांगलादेश पेटला! वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग, एकाला जिवंत जाळले; इंटरनेट सेवा खंडित

बांगलादेश पेटला! वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग, एकाला जिवंत जाळले; इंटरनेट सेवा खंडित

December 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home