मुंबई : काँग्रेस पक्ष लोकांमध्ये एक बोलतो आणि प्रत्यक्षात त्याविरुद्ध वागतो. त्यांनी आपला जुना खेळ पुन्हा सुरू केला आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आम्ही कोणाकडेही गेलो नाही. उलट स्थानिक पातळीवर मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना हे पक्ष आमच्याकडे युतीसाठी आले. स्थानिक युतीबाबतचे सर्व अधिकार आम्ही आमच्या जिल्हा कमिटीला दिले आहेत.”
घाणीत राहायचे की विकासात? अकोलेकरांनीच ठरवावे; ॲड. प्रकाश आंबेडकर याचे सवाल
ते पुढे म्हणाले, “राज्यात महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भाजप हे दोनच पक्ष ५०-५० टक्के उमेदवार उभे करू शकतात. त्यामुळे आमची ताकद स्पष्ट आहे.”
काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना त्यांनी ठामपणे सांगितले की, “ज्या ठिकाणी युतीत काँग्रेसने नीट वागणूक दिली नाही, तिथे आम्ही ती युती उडवून लावली आहे. तडजोडीच्या राजकारणाला आम्ही बळी पडणार नाही.”
या वक्तव्यामुळे राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.






