नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ३ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर लाखो भाविक आणि अनुयायी एकत्र येणार आहेत. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दिवशी प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसतर्फे पुस्तक स्टॉल्स उभारण्यात आला आहे.
दीक्षाभूमी परिसरातील कंपाउंड वॉलच्या आत स्टॉल क्रमांक २४९ आणि २५० या ठिकाणी हे साहित्य स्टॉल्स लावण्यात आले असून, वाचक आणि पुस्तकप्रेमींसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे. फुले-आंबेडकरी विचारसरणी आणि चळवळ समजून घेण्यासाठी इच्छुकांनी या स्टॉल्सना अवश्य भेट देण्याचे आवाहन प्रबुद्ध भारतने केले आहे.