Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

भिंगे बदला, व्यवस्थेचे नॅरेटिव्ह उघडे पाडा!

mosami kewat by mosami kewat
October 29, 2026
in अर्थ विषयक, राजकीय, सामाजिक
0
भिंगे बदला, व्यवस्थेचे नॅरेटिव्ह उघडे पाडा!
       

– संजीव चांदोरकर 

प्रस्थापित व्यवस्थेने प्रसृत केलेल्या सुट्या सुट्या आकडेवारीवर टीका न करता…..

….. त्यांच्याच विविध प्रकारच्या आकडेवारीला समोरासमोर ठेवून शव विच्छेदन केले पाहिजे. तरच लोकांना राजकीय अर्थव्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे आकळू शकेल! 

त्यांनी सांगितलेल्या आकडेवारी समोर दुसरी आकडेवारी ठेवून त्या जोड्या एकत्र बघा. 

पिक विमा कंपन्यांचा नफा , त्यांच्या मुख्याधिकारांना मिळालेला बोनस आणि 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या; विम्यातून पूर्ण नुकसानभरपाई न मिळणे आणि त्यातून कर्जबाजारीपणा वाढणे 

देशातील खाजगी वाहनांच्या विक्रीचे वार्षिक आकडे आणि 

रस्त्यावर अपघातात होणारे मृत्यू आणि जखमींची संख्या, अधिक वाहने , अधिक इंधन, इंधनाच्या आयातीवर अधिकाधिक डॉलर्स खर्च होणे, रुपया घसरणे, त्यातून वाढणारी महागाई 

स्पर्धा परीक्षांमधील जागा फक्त यूपीएससी/ एमपीएससी नाही अगदी शिपाई भरती साठी घेतलेल्या परीक्षा 

आणि त्याला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या; अनेक वर्षे मेहनत घेऊन स्वप्नपूर्ती न होणे , त्यातून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या 

मायक्रो फायनान्स, गोल्ड लोन कंपन्या यांच्या बॅलन्स शीट चे वाढते आकडे आणि 

गरिबांमधील वाढता अति कर्जबाजारीपणा; कर्जवसुलीसाठी होणारे अत्याचार आणि इतर मानवी शोकांतिका  

श्रीमंताच्या सेलिब्रिटींच्या लग्नावर होणारे खर्च 

आणि नियमित उत्पन्न नसल्याने लग्न देखील होत नसलेल्या तरुणांची संख्या 

देशाची जीडीपी आणि दरडोई जीडीपी, 

आणि दरडोई जीडीपी मध्ये गरीब विकसनशील देशांमध्ये आपण कोठे आहोत 

देशाच्या जीडीपीचा जगात कितवा क्रमांक 

आणि भूक निर्देशांक, आर्थिक विषमता सांगणारा गिनी निर्देशांक, यात कितवा क्रमांक 

सेन्सेक्स वाढल्यामुळे देशातील वाढलेलं बाजारमूल्य, मार्केट कॅपिटलायझेशन 

आणि किती लाख कोटी रुपयांच्या भांडवलाचा दरवर्षी नाश केला जातो 

किती आयपीओ बाजारात आले, किती भांडवल उभारणी झाली 

आणि किती आय पी ओ अंडर वॉटर म्हणजे इश्यू प्राईस पेक्षा कमी किमतीत विकले जात आहेत किंवा लिस्टेड झालेल्या किती कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री बंद आहे 

शिक्षणातील मुलींचे वाढते प्रमाण, उद्योजक स्त्रिया, नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करणाऱ्या स्त्रिया 

आणि जगातील लिंग तफावत निर्देशांकात देश जगातील १४५ देशांमध्ये १३१ व्या क्रमांकावर असणे 

सर्व काही पब्लिक डोमेन मध्ये आहे…. प्रॉब्लेम आहे आपल्या राजकीय अर्थव्यवस्थेकडे बघण्याच्या झापडबंद दृष्टिकोनात. त्यांनी आपल्या डोळ्यात आपल्या नकळत त्यांना पाहिजे ती भिंगे इम्प्लांट केली आहेत. 

वाचन, अभ्यास, आकडेवारी, विश्लेषण आणि मूल्यधारित भूमिका यांच्या तीक्ष्ण सुरीने ती भिंगे काढून टाकावी लागतील. 

तरच प्रस्थापित व्यवस्थेच्या नॅरेटिव्हला उघडे पाडता येईल. तरच पर्यायी आर्थिक प्रारूपावर चर्चा रुजू लागतील. तरच लोकांचे राजकीय शिक्षण होईल. तरच देशातील लोकशाहीला अर्थ प्राप्त होईल 


       
Tags: developmentEconomicsPoliticalPolitical Economy
Previous Post

ज्ञानेश कुमार हटाव मार्च आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भिंगे बदला, व्यवस्थेचे नॅरेटिव्ह उघडे पाडा!
अर्थ विषयक

भिंगे बदला, व्यवस्थेचे नॅरेटिव्ह उघडे पाडा!

by mosami kewat
October 29, 2026
0

- संजीव चांदोरकर  प्रस्थापित व्यवस्थेने प्रसृत केलेल्या सुट्या सुट्या आकडेवारीवर टीका न करता….. ….. त्यांच्याच विविध प्रकारच्या आकडेवारीला समोरासमोर ठेवून...

Read moreDetails
ज्ञानेश कुमार हटाव मार्च आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

ज्ञानेश कुमार हटाव मार्च आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

October 28, 2026
SNDT महिला विद्यापीठ प्रशासनाच्या टाळाटाळीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठिय्या आंदोलन!

SNDT महिला विद्यापीठ प्रशासनाच्या टाळाटाळीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठिय्या आंदोलन!

October 28, 2026
ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभार चालणार नाही ; मताधिकार वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत आंदोलन !

ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभार चालणार नाही ; मताधिकार वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत आंदोलन !

October 28, 2026
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी; २४ कॅरेट सोन्याचा भाव १.४३ लाखांवर, चांदी मात्र स्वस्त

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी; २४ कॅरेट सोन्याचा भाव १.४३ लाखांवर, चांदी मात्र स्वस्त

October 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home