मुंबई : देशाचा कारभार जिथून हाकला जातो त्या संसदेत जोरदार गोंधळ झाला. प्रेक्षक गॅलेरीत बसलेल्या काही तरुणांनी हा गोंधळ केला. त्यातील एका तरुणाने गॅलरीतून थेट सभागृहात उडी घेत, अध्यक्षांच्या स्थानाकडे धाव घेतली. त्यांच्याकडे स्मॉक कँडल देखील होते. यावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी मोदी – शहा सरकारवर सुरक्षेच्या मुद्द्यावरून ट्विट करत जोरदार टीका केली आहे.
मोदी सरकारच्या काळात जो सुरक्षाव्यवस्थेचा बाजार उठवला गेला त्याची यादीचं सुजात आंबेडकरांनी सांगितली आहे.
-पुलवामा हल्ला -2019
-अरुणाचल प्रदेशात चीनची घुसखोरी – चालू आहे.
-भारतीय जलक्षेत्रावर चीनची सागरी घुसखोरी -2019 आणि 2022.
– नवीन संसदेत अश्रुधुराचा हल्ला -2023
ही माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
संसदेत झालेल्या या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोदी-शहा यांच्यावर उपहासात्मक टीका केली.ही मोदी – शहा सरकारची सुरक्षा पातळी. असे त्यांनी यात म्हटले आहे.
आज संसदेवरील हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झाली असताना एक धक्कादायक घटना घडली आणि आज संसदेत सुरक्षेसंदर्भात असा हलगर्जीपणा असणे ही गंभीर बाब आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या तिन्ही घुसखोरांनी म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावावर लोकसभा व्हिजीटर पास घेऊन आले होते. घुसखोरांमध्ये एका तरुणीचाही समावेश असल्याचे समजते, तिचं नाव नीलम सिंग आणि अन्य एकाचं नाव सागर आहे.