परभणी : परभणी तालुक्यातील बोबडे टाकळी सर्कलमधील धारगाव येथे वंचित बहुजन आघाडीत अनेकांनी पक्ष प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष (उत्तर) तुकाराम भारती यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष (उत्तर) प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमात धारगावातील अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीत काम करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया लोकांनी दिली. या निर्णयामुळे धारगाव परिसरात आघाडीचा प्रभाव आणखी वाढण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमात तालुका अध्यक्ष प्रमोद अंभोरे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. पक्षप्रवेश सोहळा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष भगवान थोरात आणि शेख कलीम यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी तालुका अध्यक्ष प्रमोद अंभोरे, भगवान थोरात, उपाध्यक्ष शेख कलीम, तसेच स्थानिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तालुका अध्यक्ष प्रमोद अंभोरे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील चार सर्कल – टाकळी कुंभकर्ण, बोबडे टाकळी, झरी आणि पिंगळी – यामध्ये सर्कल प्रमुख व शाखा बांधणीसाठी लवकरच दौरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच परभणी तालुक्यातील गावागावात शाखा बांधणी व पक्षविस्तारासाठी कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.