हिंगोली : महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तिन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नद्यांना पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
1) सिद्धेश्वर धरण : या धरणाचे 6 गेट 0.3 मीटरने उघडण्यात आले आहेत आणि एकूण 12 दरवाज्यांतून 9869 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीमध्ये सुरू आहे.
2) येलदरी धरण : या धरणाचे 2 दरवाजे 0.5 मीटरने उघडले आहेत.
धाराशिव येथील मांजरा धरण तिसऱ्यांदा तुडुंब भरले
लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण यंदा सलग तिसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे कळंब तालुक्यासह जवळपास 18,223 हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. परिसरातील अनेक गावांना याचा फायदा होणार आहे, ज्यामुळे शेतीत पुन्हा हिरवळ फुलणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे लहान-मोठी धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. खामगाव शहराला पाणीपुरवठा करणारे गेरू माटरगाव धरण पूर्ण भरले असून, सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे आता खामगाव शहराची पाण्याची समस्या मिटली आहे. याशिवाय, जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या पेनटाकळी प्रकल्पाचे कॅचमेंट क्षेत्र भरल्यामुळे तो सध्या 89.49% भरला आहे.
हिंगोलीतील धरणांतून पाण्याचा विसर्ग, तर मांजरा, गेरू माटरगाव धरणं तुडुंब
हिंगोली : महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तिन्ही धरणांतून पाण्याचा...
Read moreDetails