Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 25, 2023
in राजकीय
0
नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर
       

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनाही खुले आव्हान !

नागपूर : पक्ष वाढवायचा की मोदी घालवायचा हे आधी स्पष्ट करा, जागांच्या वाटपावरून जर अडून बसाल तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. असा घणाघात हल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद आयोजित करण्यात आली होती.

आरएसएसवाल्यांना हिंदूंना एकत्रित करण्याचा एक कार्यक्रम देतो तो म्हणजे, एक हिंदू धर्मशास्त्राचे विद्यापीठ उभ करायचं जे धर्माशिवाय दुसरं काय करणार नाही. आणि एक कायदा करायचा की, हिंदू पुजारी हा त्या विद्यापीठातील पदवीधर असायला हवा. तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो. हा माझा सल्ला आहे. हा मान्य केला तर मी तुम्हाला हाथ देईल असे आव्हान त्यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना केले आहे.

पूर्वी सत्तेचे केंद्र हे धर्म असायचे, आता सत्ता केंद्र हे संसद आहे. संसदेवर ज्याचा ताबा असतो त्यांचीच व्यवस्था असते, म्हणून आपल्याला आपली व्यवस्था कायम ठेवायची असेल तर संसद आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

मनुस्मृतीची व्यवस्था ही अधिकार हिसाकावून घेणारी व्यवस्था आहे. समता प्रस्थापित न करणारी व्यवस्था आहे, व्यक्ती स्वातंत्र्य नाकारणारी व्यवस्था आहे, न्याय न देणारी आहे.म्हणून आपण संविधान निर्मित व्यवस्था आपण पुरस्कृत करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

समाजामध्ये एकोपा पाहिजे की, विभक्तपणा पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. गुलामी आणि विषमता पाहिजे असेल तर विभक्त पणाचा आधार घ्यावा लागतो. यातून आपण द्वेष करायला सुरुवात करतो. आपली क्रांती ही मानवतावादासाठी आहे. त्यासाठी इथल्या मानवांना एकत्रित करणे हे आपले कार्य आहे. हा लढा विषमते विरुध्द एकता प्रस्थापित करण्यासाठी आहे. वर्चस्व नावाची संकल्पना ही विभक्तवादी विचारांतचं जन्माला येते आणि टिकते. संघटित राहण्याच्या विचारांत वर्चस्व वादाला जागाचं नसते,असे त्यांनी म्हटले आहे.

दबावाचं राजकारण सुरू आहे, दमबाजीचे राजकारण सुरू आहे, ब्लैकमेलिंगचे राजकारण सुरू आहे, कशासाठी? तर मार्च – एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुका या प्रतिक्रांतीवाद्यांना जिंकायच्या आहेत म्हणून हे सगळं चाललं आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही इंडिया आघाडीत सामील व्हायला तयार आहोत मात्र, आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करायची आहे असेही त्यांनी आजच्या सभेत सांगितले.

नागपूरमधून जे प्रतिक्रांतीचे भूत उभ राहत आहे त्याला गाडण्यासाठी आम्ही निघालो आहोत. काँग्रेसवाले, राहुल गांधी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार असतील त्यांच्या मदतीला आम्ही निघालो आहोत. पण दुर्दैवाने ते नागपुरच्या भुताला गाढण्याऐवजी ते मलाच गाडायला निघाले आहेत. यातून कोणाचं भलं होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.इंडिया आघाडी सोबत आली तर त्यांचं स्वागतचं आहे. पण जर नाही आली तरी आपल्याला लढावचं लागणार आहे. लढायचं असेल तर आजपासून ठरवलं पाहिजे की, फालतू चर्चा बंद करून मी ज्या मतदार संघात आहे तो मतदारसंघ आम्ही जिंकल्या शिवाय राहणार नाही असा निर्धार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यावरही त्यांनी यावेळी हल्लाबोल केला ते म्हणाले की, मोहन भागवत माझा तुम्हाला सवाल आहे की, मिलिटरीच्या ८० गाड्यांचा ताफा होता, मिलीट्रीच्या गाड्या १० च्यावर जात नाही आणि जेव्हा याच्यावरती त्या जातात बॉम्बस्फोट झाला तरी जवान वाचावेत म्हणून त्यांना डबल पॅक केलं जात. मग जी ट्रान्सपोर्टची गाडी उडवण्यात आली तिला डबल पॅक केलं होतं का? याचा खुलासा करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी मोहन भागवत आणि आरएसएस यांना केले दिले आहे.

नरेंद्र मोदींच्या ५६ इंच छातीत गाठया आणि ढोकळेच आहेत बाकी काही नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

उद्याची लोकसभा ही फुले – शाहू – आंबेडकरवादी विचारांनी चालली पाहिजे. हे लक्षात घ्या. त्यासाठी जे करायचं आहे ते करण्यासाठीं सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले आहे.सुरक्षा ही व्यक्तिगत नसते तर व्यवस्थेत असते. व्यवस्था टिकली तर आपण टिकतो. म्हणून ही व्यवस्था सुरक्षित करण्याची जबाबदारी आपली आहे.

या सभेला वंचित बहुजन आघडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, प्रा.अंजलीताई आंबेडकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. निशाताई शेंडे, सविताताई मुंडे, डॉ. गजाला खान, यासह हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.


       
Tags: MaharashtraMANUSMRITInagpurPrakash AmbedkarStri muktiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर काय बोलले ?

Next Post

मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा;  ‘वंचित’ ने जाहीर केला जागावाटपाचा फॉर्म्युला!

Next Post
मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा;  ‘वंचित’ ने जाहीर केला जागावाटपाचा फॉर्म्युला!

मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा;  'वंचित' ने जाहीर केला जागावाटपाचा फॉर्म्युला!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!
बातमी

बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

by mosami kewat
November 19, 2025
0

बीड : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन पूर्ण ताकतीने लढत आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

November 19, 2025
उरण-मुंबई बेस्ट बससेवेला सुरूवात; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

उरण-मुंबई बेस्ट बससेवेला सुरूवात; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

November 19, 2025
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने निवडून द्या : सुजात आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने निवडून द्या : सुजात आंबेडकर

November 19, 2025
अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला त्वरित फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला त्वरित फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

November 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home