भंडारा : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी साकोली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये वंचित बहुजन महिला आघाडी भंडाऱ्याच्या जिल्हाध्यक्ष तनुजा अमित नागदेवे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव डी. जी. रंगारी, ओबीसी समाजाचे मुख्य समन्वयक तसेच जनगणना परिषदेचे सदानंद इलमे, बाळकृष्ण सावे, जयंत झोडे, भगीरथ धोटे, अरुण लुटे, ललिता देशमुख, मंगला वाडीभस्मे, मनीष कापगते, अमोल हलमारे, रोशन उरकुडे, रमेश शहारे, आदिनाथ गेडाम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मोर्चाची सुरुवात लहरी बाबांच्या मठापासून करण्यात आली. येथून एकोडी रोड, बस स्टॉपमार्गे तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाने कूच केली. तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :
- शासनाने तात्काळ जातीनिहाय जनगणना करावी, ज्यामुळे प्रत्येक समाजाची लोकसंख्या व सामाजिक-आर्थिक स्थिती स्पष्ट होईल.
- ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे.
- मराठा आंदोलकांच्या दबावाखाली ओबीसींच्या आरक्षणावर कुठलाही निर्णय शासनाने घेऊ नये.
- दिनांक २ सप्टेंबर रोजीचा जीआर तात्काळ रद्द करावा.
तहसील कार्यालयावर झालेल्या मार्गदर्शन सत्रात तनुजा नागदेवे, सदानंद इलमे, मनीष कापगते, राधेश्याम मंगमोडे, जयंत झोडे, बाळकृष्ण सावे, मंगला वाडीभस्मे आदींनी भाषण करून समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले.
यानंतर २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरची प्रत सर्वांसमक्ष होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी ज्ञानेश्वर बाहेकर, अभिमन्यू चूटे, खेमचंद कावडे, पूजा देशमुख, कार्तिक मेश्राम, ईश्वर कटणकर, युद्धेश कुमार भेंडारकर, सुधीर भांडारकर, वीरेंद्र भंडारकर, गीता बोरकर, कुंदा मंगलमारे, सचिन खोटेले यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव, महिला व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.