Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Bhandara Protest : साकोलीत ओबीसी समाजाचा मोर्चा, २ सप्टेंबरचा जीआर जाळून निषेध

mosami kewat by mosami kewat
September 20, 2025
in बातमी
0
Bhandara Protestसाकोलीत ओबीसी समाजाचा मोर्चा, २ सप्टेंबरचा जीआर जाळून निषेध

Bhandara Protestसाकोलीत ओबीसी समाजाचा मोर्चा, २ सप्टेंबरचा जीआर जाळून निषेध

भंडारा : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी साकोली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये वंचित बहुजन महिला आघाडी भंडाऱ्याच्या जिल्हाध्यक्ष तनुजा अमित नागदेवे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव डी. जी. रंगारी, ओबीसी समाजाचे मुख्य समन्वयक तसेच जनगणना परिषदेचे सदानंद इलमे, बाळकृष्ण सावे, जयंत झोडे, भगीरथ धोटे, अरुण लुटे, ललिता देशमुख, मंगला वाडीभस्मे, मनीष कापगते, अमोल हलमारे, रोशन उरकुडे, रमेश शहारे, आदिनाथ गेडाम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मोर्चाची सुरुवात लहरी बाबांच्या मठापासून करण्यात आली. येथून एकोडी रोड, बस स्टॉपमार्गे तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाने कूच केली. तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :

  1. शासनाने तात्काळ जातीनिहाय जनगणना करावी, ज्यामुळे प्रत्येक समाजाची लोकसंख्या व सामाजिक-आर्थिक स्थिती स्पष्ट होईल.
  2. ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे.
  3. मराठा आंदोलकांच्या दबावाखाली ओबीसींच्या आरक्षणावर कुठलाही निर्णय शासनाने घेऊ नये.
  4. दिनांक २ सप्टेंबर रोजीचा जीआर तात्काळ रद्द करावा.

तहसील कार्यालयावर झालेल्या मार्गदर्शन सत्रात तनुजा नागदेवे, सदानंद इलमे, मनीष कापगते, राधेश्याम मंगमोडे, जयंत झोडे, बाळकृष्ण सावे, मंगला वाडीभस्मे आदींनी भाषण करून समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले.

यानंतर २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरची प्रत सर्वांसमक्ष होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी ज्ञानेश्वर बाहेकर, अभिमन्यू चूटे, खेमचंद कावडे, पूजा देशमुख, कार्तिक मेश्राम, ईश्वर कटणकर, युद्धेश कुमार भेंडारकर, सुधीर भांडारकर, वीरेंद्र भंडारकर, गीता बोरकर, कुंदा मंगलमारे, सचिन खोटेले यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव, महिला व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: bhandaraMaharashtraobcPrakash AmbedkarprotesreservationSakoli GR repealSocial justice protestVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

गायक-संगीतकार झुबीन गर्ग यांचे स्कूबा डायव्हिंग करताना निधन; ‘या अली’ गाण्यामुळे मिळाली होती लोकप्रियता

Next Post

Prakash Ambedkar : भारताविरुद्ध ट्रम्प यांचे ‘मूक युद्ध’ सुरू; H1B व्हिसा शुल्क वाढीवरून प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
बातमी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

by mosami kewat
August 14, 2026
0

नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू...

Read moreDetails
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home