नाशिक : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनींना मिळत असलेल्या निकृष्ट सुविधा आणि अमानवी वागणुकीच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकने आवाज उठवला आहे. आंदोलनाच्या वतीने सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांना निवेदन सादर करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहात विद्यार्थिनींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात प्रामुख्याने गृहपालांकडून मिळणारी शिवीगाळ, जातीवाचक वक्तव्ये आणि अपमानास्पद वागणूक यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, जेवणाचा दर्जा अत्यंत वाईट असून, जेवणात किडे, झुरळे आणि माती सापडत असल्याच्या तक्रारीही आहेत. विद्यार्थिनींसाठी येणारे अन्नपदार्थ वैयक्तिक वापरासाठी वळवले जात असून, वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
विद्यार्थिनींच्या मुख्य मागण्या :
– संबंधित गृहपाल अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करून चौकशी करावी.
– वसतिगृहातील जेवण, सुरक्षा आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा करावी.
- निधी आणि निर्वाह भत्त्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकचे जिल्हाध्यक्ष मिहिर प्रमोद गजबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, युवा आघाडीचे महानगर महासचिव दीपक पगारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि वसतिगृहातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जर या मागण्यांवर त्वरित कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिला आहे.
२ वर्षांपासून सारथीची फेलोशिप ठप्प, तर महाज्योतीचे विद्यावेतनही केले बंद
आर्थिक अडचणीमुळे शहरातील त्रस्त विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात औरंगाबाद : मराठा आंदोलन तीव्र झाल्यानंतर राज्य सरकारने सारथीअंतर्गत राबवलेल्या योजनांचे बॅनर शहरात...
Read moreDetails