Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही, तर ठोकशाहीचा पंतप्रधान – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 30, 2023
in बातमी
0
नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही, तर ठोकशाहीचा पंतप्रधान – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

सांगली : नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही तर, ठोकशाहीचा पंतप्रधान आहे. लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत तो एकही पत्रकार परिषद घेणार नाही, त्याला माहीत आहे सभेत आपण फेकू शकतो. पत्रकारांना समोर जाऊन उत्तर द्यायला मोदी घाबरतो. मोदी पत्रकाराला घाबरतो कारण पत्रकार याच्यापेक्षा हुशार आहेत, असा हा भित्रा पंतप्रधान आहे. याची नावालाच फक्त 56 इंच छाती आहे. असे म्हणत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगली येथे आज सत्ता संपादन निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या सभेत त्यांनी आरएसएस आणि भाजप यांच्यावर प्रखर टीका केली आहे.

आरएसएस भाजपच्या दहा वर्षातील सत्तेचा हिशोब मांडायची सुरुवात केली पाहिजे. या देशात टोमॅटोचा तुटवडा करून, ३५ हजार कोटींची लूट केली आहे. यावर भाजप – आरएसएसशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत. हे लुटारुंचं सरकार आहे, यांना आता मार्गी लावून टाका. पुन्हा यांना सत्तेवर आणण्याची गरज नाही. असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

पाच वर्षात निवडणुका होतात सरकार बदलतं. आतापर्यंत आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत यायचा कधी प्रयत्न केला नाही पण यावेळी आम्ही सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही. असा जाहीर निर्धार ॲड. आंबेडकरांनी या सभेत केला.

मागच्या दहा वर्षात हजारोंच्यावरती आपले सैनिक शहीद झाले आहेत. कारगिलच्या युद्धात सुद्धा एवढे सैनिक शहीद झाले नव्हते. १९५० ते २०१४ या कालावधीत भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेणारे ७,६४४ हिंदू कुटुंबे आहेत. २०१४ ते २०२३ या कालावधीत ज्यांची मालमत्ता किमान ५० लाख आहे, अशा १४ लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलं. अन हे हिंदूराष्ट्र करायचं म्हणत आहेत, थू तुमच्या जिंदगानीवर असे म्हणत त्यांनी देशातून परदेशात जाऊन तेथील नागरिकत्व स्वीकारणाऱ्या गंभीर बाबीवर त्यांनी लक्ष वेधले आहे.

या मूर्ख सरकारच्या नादी आम्हाला लागायचं नाहीये, आमच्या बापजाद्याची इभ्रत वाचवायची आहे, म्हणून आम्ही नागरिकत्व सोडलं, असे परदेशी गेलेले भारतीय म्हणत असतात. या १४ लाख लोकांवर गुमनाम जगण्याची वेळ या भाजपने आणलीय. असे त्यांनी सांगितले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ, राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, संतोष सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.


       
Tags: democracynarendra modiPrakash Ambedkar
Previous Post

उत्तरकाशी मधील मोहिमेचे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केले अभिनंदन !

Next Post

वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँग्रेसबरोबरच्या युतीच्या शक्यतेला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसमधील निजामी मराठ्यांचा अपप्रचार – ॲड. प्रियदर्शी तेलंग

Next Post
वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँग्रेसबरोबरच्या युतीच्या शक्यतेला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसमधील निजामी मराठ्यांचा अपप्रचार – ॲड. प्रियदर्शी तेलंग

वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँग्रेसबरोबरच्या युतीच्या शक्यतेला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसमधील निजामी मराठ्यांचा अपप्रचार - ॲड. प्रियदर्शी तेलंग

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भिवंडीत वंचित बहुजन आघाडीत अनेकांचा  पक्षप्रवेश; विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश
Uncategorized

भिवंडीत वंचित बहुजन आघाडीत अनेकांचा पक्षप्रवेश; विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश

by mosami kewat
November 15, 2025
0

भिवंडी : वंचित बहुजन आघाडी (VBA) भिवंडी शहर शाखेतर्फे आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील नागरिक, बहुजन,...

Read moreDetails
भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

November 14, 2025
बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

November 14, 2025
नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

November 14, 2025
राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

November 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home