नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे ‘स्वाभिमानी निर्धार मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीने आगामी काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून स्वाभिमानाने सत्ता काबीज करण्याचा निर्धार केला. पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने युवकांनी सुजात आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.
ते पुढे म्हणाले की, “मजलूम, मुस्लिम आणि वंचित समाजाला आतापर्यंत फसवले गेले आहे आणि फसवणारे दुसरे-तिसरे कोणी नसून काँग्रेस पक्ष आहे.”
मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना युवा नेते सुजात आंबेडकर यांनी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती (NDA) या दोन्ही गटांवर जोरदार टीका केली. त्यांनी आपल्या भाषणात महत्त्वपूर्ण विधान केले, “जनतेला हे समजून घ्यावे लागेल की घरात साप आहे आणि बाहेर लांडगा आहे. सर्वात आधी तुम्हाला घरातील सापापासून सावधान राहावे लागणार आहे. तो साप म्हणजे काँग्रेस आहे, तर लांडगा म्हणजे भाजप, आरएसएस, शिंदे गट (शिवसेना) आणि अजित पवार गट (राष्ट्रवादी) आहेत.”
https://www.youtube.com/live/-xhtYnQDWxI?si=c9TXGQPUvfj5ALZC
मेळाव्यात पक्षप्रवेश केलेल्या युवकांना सुजात आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद आणखी वाढली आहे.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, युवा आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य अक्षय बनसोडे, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, इंजि. प्रशांत इंगोले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






