Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नांदेडमध्ये ‘स्वाभिमानी निर्धार मेळावा’ उत्साहात; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत युवकांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश!

mosami kewat by mosami kewat
November 2, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नांदेडमध्ये 'स्वाभिमानी निर्धार मेळावा' उत्साहात; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत युवकांचा 'वंचित'मध्ये प्रवेश!

नांदेडमध्ये 'स्वाभिमानी निर्धार मेळावा' उत्साहात; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत युवकांचा 'वंचित'मध्ये प्रवेश!

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे ‘स्वाभिमानी निर्धार मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीने आगामी काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून स्वाभिमानाने सत्ता काबीज करण्याचा निर्धार केला. पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने युवकांनी सुजात आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.

ते पुढे म्हणाले की, “मजलूम, मुस्लिम आणि वंचित समाजाला आतापर्यंत फसवले गेले आहे आणि फसवणारे दुसरे-तिसरे कोणी नसून काँग्रेस पक्ष आहे.”

मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना युवा नेते सुजात आंबेडकर यांनी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती (NDA) या दोन्ही गटांवर जोरदार टीका केली. त्यांनी आपल्या भाषणात महत्त्वपूर्ण विधान केले, “जनतेला हे समजून घ्यावे लागेल की घरात साप आहे आणि बाहेर लांडगा आहे. सर्वात आधी तुम्हाला घरातील सापापासून सावधान राहावे लागणार आहे. तो साप म्हणजे काँग्रेस आहे, तर लांडगा म्हणजे भाजप, आरएसएस, शिंदे गट (शिवसेना) आणि अजित पवार गट (राष्ट्रवादी) आहेत.”

https://www.youtube.com/live/-xhtYnQDWxI?si=c9TXGQPUvfj5ALZC

मेळाव्यात पक्षप्रवेश केलेल्या युवकांना सुजात आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद आणखी वाढली आहे.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, युवा आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य अक्षय बनसोडे, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, इंजि. प्रशांत इंगोले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: MaharashtranandedPoliticalSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

जालना जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक पार पडली

Next Post

प्रकाश आंबेडकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका! “शेतकऱ्यांना भिक नको, त्यांचा हक्क हवा आहे!”

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

by mosami kewat
July 14, 2026
0

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाव-खेड्यांमध्ये वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकानांसाठी तातडीने जाहीर प्रकटन काढावे, तसेच...

Read moreDetails
शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा; वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा प्रशासनाला निवेदन

शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा; वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा प्रशासनाला निवेदन

July 14, 2026
सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत वाढली चिंता; वंचित बहुजन आघाडीकडून उपोषण मागे घेण्याचे आवाहन!

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत वाढली चिंता; वंचित बहुजन आघाडीकडून उपोषण मागे घेण्याचे आवाहन!

July 14, 2026
भूममधील कथित सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; लाखो लिटर भेसळयुक्त दुधाचा संशय, राज्यभर खळबळ

भूममधील कथित सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; लाखो लिटर भेसळयुक्त दुधाचा संशय, राज्यभर खळबळ

July 14, 2026
TET पेपर फुटी प्रकरण – सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या!

TET पेपर फुटी प्रकरण – सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या!

July 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home