Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रकाश आंबेडकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका! “शेतकऱ्यांना भिक नको, त्यांचा हक्क हवा आहे!”

mosami kewat by mosami kewat
November 2, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
प्रकाश आंबेडकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका! “शेतकऱ्यांना भिक नको, त्यांचा हक्क हवा आहे!”

प्रकाश आंबेडकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका! “शेतकऱ्यांना भिक नको, त्यांचा हक्क हवा आहे!”

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. अजित पवार यांनी केलेल्या “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” या विधानावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, “अजित पवारजी, तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का?”

महाराष्ट्रातील शेतकरी आजही अवकाळी पावसामुळे, पिकांच्या नुकसानीमुळे आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे मोठ्या अडचणीत आहेत. “हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात, पण तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही,” असे ते म्हणाले.

सोयाबीनसाठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ५,३२८ रुपये असूनही शेतकऱ्यांना फक्त ३,५०० ते ४,००० रुपये भाव मिळत असल्याचा मुद्दा मांडत आंबेडकर म्हणाले की, “याचा अर्थ शेतकऱ्यांना जवळजवळ ३० टक्के तोटा सहन करावा लागत आहे. कापसाची स्थितीही तितकीच गंभीर आहे.”

https://youtu.be/cSdNZJ0vIW8?si=AW179GDDPBVpD1Qr

ते पुढे म्हणाले की, “अवकाळी पावसाने राज्यातील २९ जिल्ह्यांतील ६८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने मदत जाहीर केली असली तरी एक पैसाही शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेला नाही. शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली, आणि त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या.”
सरकारच्या निष्क्रीय भूमिकेवर टीका करत आंबेडकर म्हणाले, “तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात का? शेतकऱ्यांना भिक नको, त्यांना त्यांचे हक्क हवेत!”

वंचित बहुजन आघाडीने अजित पवार यांच्या शेतकरीविरोधी विधानाचा तीव्र निषेध नोंदवला असून, राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

Tags: AgricultureFarmerMaharashtramumbaipoliticsPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

नांदेडमध्ये ‘स्वाभिमानी निर्धार मेळावा’ उत्साहात; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत युवकांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश!

Next Post

बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द खपवून घेणार नाही; वंचित बहुजन आघाडी

Next Post
बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द खपवून घेणार नाही; वंचित बहुजन आघाडी

बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द खपवून घेणार नाही; वंचित बहुजन आघाडी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आंबेडकरी कार्यकर्ता आपली मते प्रभावीपणे मांडू शकतो ; सुजात आंबेडकरांचा आरक्षण आणि मेरिटवर बोट ठेवणाऱ्यांवर निशाणा 
बातमी

आंबेडकरी कार्यकर्ता आपली मते प्रभावीपणे मांडू शकतो ; सुजात आंबेडकरांचा आरक्षण आणि मेरिटवर बोट ठेवणाऱ्यांवर निशाणा 

by mosami kewat
August 3, 2026
0

मुंबई : अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो आणि मांडत आहे. फरक फक्त एवढाच आहे...

Read moreDetails
चीनच्या घुसखोरीवर आक्रमकपणा का नाही? अल्पवयीन मुलींवरील कारवाईवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

चीनच्या घुसखोरीवर आक्रमकपणा का नाही? अल्पवयीन मुलींवरील कारवाईवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

August 3, 2026
आरोग्य सेवा की नफ्याची बाजारपेठ? हॉस्पिटल्सच्या वित्तीयीकरणाचा सामाजिक प्रभाव

आरोग्य सेवा की नफ्याची बाजारपेठ? हॉस्पिटल्सच्या वित्तीयीकरणाचा सामाजिक प्रभाव

August 3, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची मतमोजणी अजूनही सुरूच !

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची मतमोजणी अजूनही सुरूच !

August 3, 2026
अमित शहा गो बॅक! वंचित बहुजन आघाडीचे पुण्यात काळे झेंडे दाखवून आंदोलन

अमित शहा गो बॅक! वंचित बहुजन आघाडीचे पुण्यात काळे झेंडे दाखवून आंदोलन

August 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home