कंधार – वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे, जिल्हा अध्यक्ष शिवा नारंगले, महासचिव श्याम कांबळे यांच्या नेतृत्वात चालू असलेल्या या दौऱ्यात दिनांक 23 जुलै रोजी कंधार येथे, शिवसेना व्यापारी आघाडीचे तसेच युवा मल्हार सेनेचे खंडू अकोले तसेच मराठा समाज्याचे नेतृत्व माधव जाधव पाटील यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
या प्रवेशाने वंचित बहुजन आघाडीची नांदेड जिल्ह्यातील ताकद प्रचंड वाढली आहे . बाळासाहेबांना अपेक्षित वंचित बहुजन आघाडीची बांधणी नांदेड मध्ये करू असे प्रतिपादन या वेळी शिवा नारंगले यांनी केले .