Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

संविधान चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; महाराष्ट्र बंद आंदोलनात नागपूरचा उत्स्फूर्त सहभाग

mosami kewat by mosami kewat
July 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
संविधान चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; महाराष्ट्र बंद आंदोलनात नागपूरचा उत्स्फूर्त सहभाग
       
नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांना समर्थन दर्शविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आंदोलनाची सुरुवात संविधान चौकातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर संविधान चौक ते बर्डी असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन वाहनांमध्ये बसविल्याची माहिती आयोजकांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील जंतर-मंतर येथे 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांवरील दडपशाहीचा निषेध करत राज्यभर महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांत बंद आंदोलनात कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग नोंदविला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अजय सहारे, अनिरुद्ध मडके, महानंदा राऊत, शहर महासचिव मनोज सुटे, राहुल दहिकर, सी.सी. वासे, ॲड. सुजाता वाल्देकर, भगवान भोंडे, प्रशांत नगरकर, वैभव येवले, शुभम वाहने, राजेश जंगले, किशोर धोटे, प्रिन्स शामकुळे, ॲड. नलिनी खांडेकर, वर्षा बनसोड, विजय बागडे, किरण देवरे, शाहनवाज मलिक यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: MaharashtraMaharashtra BandhnagpurPoliticalPrakash Ambedkar
Previous Post

गोंदियात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ निदर्शने

Next Post

विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला – सुजात आंबेडकर

Next Post
विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला – सुजात आंबेडकर

विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला - सुजात आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर
बातमी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर

by mosami kewat
September 22, 2026
0

मुंबई : IIT बॉम्बेशी संबंधित साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी संस्थेच्या भूमिकेवर...

Read moreDetails
वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी

वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी

September 22, 2026
पुणे विद्यापीठातील मेसच्या दरवाढीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; दर कमी करण्याची मागणी

पुणे विद्यापीठातील मेसच्या दरवाढीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; दर कमी करण्याची मागणी

September 22, 2026
विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

September 22, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

September 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home