Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला – सुजात आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
July 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला – सुजात आंबेडकर
       
३५०० कार्यकर्तेपोलीसंचा ताब्यात ; तरीही ‘ महाराष्ट्र बंद ‘ यशस्वी

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदवर ट्विट द्वारे प्रतिक्रिया देत म्हटले की, विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला आहे. तसेच हा बंद यशस्वी आणि शांततेत चालू आहे.

सुजात आंबेडकर यांनी म्हटले की, दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या, आपल्या भविष्यासाठी चिंतीत असलेल्या विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटीला जबाबदार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेकडे शांततापूर्ण मार्च काढला. मात्र, हुकूमशाही भाजप सरकारने अमानुष आणि क्रूर पद्धतीने विद्यार्थ्यांवर मारहाण केली.

विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील जनता हुकूमशाहीच्या विरोधात आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनात एकत्र आली असल्याचेही त्यांनी म्हटले.

वंचित बहुजन आघाडीसह महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, व्यापारी, समविचारी पक्ष, संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने कडकडीत बंद पाळला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्र बंदच्या दरम्यान ३५०० पेक्षा अधिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तरी सुद्धा आम्ही शांततपूर्वक महाराष्ट्र बंद करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाने कितीही प्रयत्न केला तरी वंचित बहुजन आघाडी दडपशाहीला हुकूमशाहीला घाबरणार नाही, असा इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला.

हा बंद शांततापूर्ण सुरू असून यशस्वी ठरत आहे. भाजप-आरएसएसच्या विरोधात आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण सर्व एकत्र लढून शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर न्याय मिळवून देऊ. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: MaharashtraMaharashtra BandhPoliticalSujat Ambedkar
Previous Post

संविधान चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; महाराष्ट्र बंद आंदोलनात नागपूरचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला तुळजापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध पक्ष-संघटनांचा सहभाग

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home