परभणी : जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील अनेक बांधवांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, युवा जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान, जिल्हा सचिव युसुफ कलीम, यशवंत सोनवणे तसेच युवा नेते सोफियान शेख प्रमुख उपस्थित होते.
पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये डॉ. सूफियान खान, शेख हमीद बाबा, शेख बाबू बाबा, सय्यद खलील, शेख मल्लू, शेख ताहेर, शब्बीर खान, इकबाल भाई, अमजद बाबा, अल्ताफ बाबा, शेख अमजद बाबा, सय्यद अल्लादिन, शेख हुसेन बाबा, शेख हसन बाबा, सय्यद अजीज, वसीम खान, इरफान शेख, शेख समीर, शेख सोहेल, शेख इस्माईल, शेख इब्राहिम, मजहर खान, सूफियान शेख यांसह अनेक मुस्लिम बांधवांचा समावेश आहे.
या पक्ष प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी अधिक सबळ होणार असून आगामी काळात मुस्लिम समाजाच्या प्रश्नांसाठी ठामपणे आवाज उठविण्याची भूमिका घेण्यात येईल, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व बांधवांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले.
भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर
हिंगोली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी...
Read moreDetails






