मुंबई : मुंबईतील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते खोदकामावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र व्यंगात्मक टीका केली आहे.
आंबेडकर म्हणाले की, “मोदींच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील भाजप सरकारने मोदींची इन्टायर पोलिटिकल सायन्सची पदवी शोधण्यासाठी बीएमसीला रस्ते खोदण्याचे काम दिले आहे. मोदींची पदवी जमिनीखाली खोलवर गाडली गेली आहे, असे बीएमसीचे मत आहे.”
दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बी.ए. पदवीचा तपशील सार्वजनिक करण्याच्या केंद्रीय माहिती आयोगाचा आदेश न्यायालयाने रद्द केला आहे.
तसेच सध्या मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांची डांबरीकरण कामे, मेट्रो प्रकल्प, पाणीपुरवठा व मलनिस्सारणाच्या लाईन टाकण्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.