अकोला, दि. २३- ३० एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससी (MPSC) स्पर्धा परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल झाली असून कुठल्याही पुराव्या आणि चौकशी शिवाय डेटा लीक झाला नसल्याचा हास्यास्पद दावा एमपीएससी ने केला असून दिशाभूल करणारा असल्याचा आरोप वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केला असून OTP किंवा Password शिवाय प्रवेश प्रमाणपत्रे कशी डाऊनलोड झाली, यांचे स्पष्टीकरण आयोगाने द्यावे तसेच एमपीएससी च्या सर्व्हिस प्रोवायडर व संबंधित अधिकारी कर्मचारी ह्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहूजन युवा आघाडीने केली आहे.
राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची झोप उडवणारी घटना आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या स्पर्धा परीक्षेचे हॉल तिकीट एका टेलिग्राम चॅनेलवर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, आणि क च्या परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल झाले.एका टेलिग्राम चॅनलवर ९० हजारांपेक्षा जास्त हॉल तिकिट अपलोड करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.या प्रकरणानंतर आयोगाने सायबर पोलिसात दाखल केली आहे.त्यासोबतच आयोगाने कुठल्याही प्रकारचा डेटा लीक झाला नाही, असा बालिश दावा केला आहे.ही बनवाबनवी आहे. जिथे एका विध्यार्थी स्वतःचे डाऊनलोड करायला ६ तास लागतात तिथे एवढ्या मोठ्या संख्येने हॉल तिकीट बाह्य लिंक वरून कशी काढली गेली ?OTP किंवा Password शिवाय प्रवेश प्रमाणपत्रे कशी डाऊनलोड झाली, यांचे स्पष्टीकरण आयोगाने दिले पाहिजे. हयात आयोगाचे तंत्रज्ञ किंवा कर्मचारी लिप्त असल्याची शंका असून त्याचाही तपास झाला पाहिजे.ह्या घटनेमुळे आयोगाची पारदर्शकता धोक्यात आली आहे.केवळ आयोगावर विश्वास ठेवून रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या बेरोजगार युवकांना आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून विकले जात आहे.डेटा लिक करणाऱ्याने प्रश्नपत्रिकाही असल्याचा दावा केलाय तो आयोगाने क्षणात खोडून काढला.असला तरी ह्याची सखोल चौकशी आवश्यक आहे.आयोगाची ऑनलाईन प्रणाली ही अकार्यक्षम आहे, हे अनेक वेळा सिध्द झाले आहे. परंतु विद्यार्थ्यांचा डेटा चोरी होईपर्यंत जर प्रकरण जात असेल, तर गंभीर बाब आहे.डेटा हॅक करणाऱ्यांबरोबरच आयोगातील डेटा किपिंग आणि वेबसाईटवर हाताळणी ह्यास जबाबदार असणाऱ्या सर्व्हिस प्रोवायडर, तज्ञ व इतर संबंधित व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक आहे.जवळ जवळ जवळ १ लाख हॉल तिकीट लिक झालेले असताना आयोग हास्यास्पद दावा करीत आहे की, काहीच लीक झालेलं नाही. एवढ्या कमी वेळात कशी शहानिशा करण्यात आली ह्याचा खुलासा आयोगाने केली पाहिजे. जेथे निकाल लावायला यांना सहा सहा महिने लागतात तिथे अगदी तासभरात काहीच लीक झालेलं नाही हा दावा संशयास्पद आहे.
पोलिसांच्या सायबर सेल कडून टेलिग्राम चॅनल वरील उमेदवारांची वैयक्तिक माहिती तातडीने नष्ट करणे गरजेचे आहे.झालेल्या प्रकारची पूर्ण चौकशी करून नवीन प्रश्नपत्रिका आणि नवीन प्रवेशपत्र जारी करावे.सोबतच ही परीक्षा पुढे ढकलली जाणे गरजेचे आहे.
विद्यार्थी अभ्यासात व्यस्त आहेत .”परीक्षा देणं महत्त्वाचं नाही तर ती पारदर्शक होणे ही सर्वात महत्वाची बाब आहे. ” जवळ जवळ १ लाख हॉल तिकीट लिक होणे ही मोठी शोकांतिका आहे.आयोगाच्या भोंगळ कारभार त्याला जबाबदार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या असलेलं कथित कार्यकुशल मनुष्यबळ आणि माहिती व तंत्रज्ञान पाहता कीव करावी एवढी लचर तंत्रज्ञान आयोगा कडे उपलब्ध आहे.सबब परीक्षा पुढे ढकलून संपूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहूजन युवा आघाडीने केली आहे.