अकोला : शिक्षणासाठी अकोल्यात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या ऑटोमध्ये विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून, पीडित मुलीने दाखवलेल्या हिमतीमुळे आरोपी ऑटो चालकाला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
जाफर खान सुभेदार खान (रा. नवेगाव, अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा येथील ही विद्यार्थिनी नीटच्या शिकवणी वर्गासाठी अकोल्यात भाड्याच्या खोलीत राहते.
आजारी असल्यामुळे ती परतवाड्याला गेली होती. आणि शुक्रवारी सायंकाळी बसने अकोल्यात परतली. बसस्थानकावरून आपल्या खोलीवर जाण्यासाठी ती एका ऑटोरिक्षामध्ये बसली. मात्र, ऑटो बसस्थानकावरून निघाल्यावर चालकाने तो वेगळ्याच मार्गाने नेण्यास सुरुवात केली.
तेव्हा मुलीला संशय येताच तिने प्रसंगावधान राखत आपल्या मित्राशी फोनवर संपर्क साधला. ती हा प्रकार मित्राला सांगत असतानाच ऑटो चालकाने तिचा हात पकडून स्वतःकडे ओढले आणि तिचा विनयभंग केला.
मुलीने प्रतिकार केला असता त्याने तिच्या डाव्या हातावर आणि दंडाला चावा घेतला. तरीही, मुलीने मोठ्या हिमतीने स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ गांभीर्य ओळखून ऑटो चालकाचा शोध सुरू केला.
मुलीने दिलेल्या ऑटो क्रमांकामुळे पोलिसांना आरोपीला शोधण्यात मोठी मदत झाली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून, ऑटोदेखील ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी कलम ७४, ११८ (१), १३७ (२) बीएनस कलम ८ पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन...
Read moreDetails