Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन

mosami kewat by mosami kewat
February 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन

अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन

उस्मानाबाद : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथील गोसावी समाजातील बाबू जाधव कुटुंबाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करून मुलीचा शोध घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. (osmanabad News)

बाबू जाधव हे उदरनिर्वाहासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे वास्तव्यास आहेत. फिरस्ती करून अत्तर विक्री हा त्यांचा व्यवसाय असून, लोहारा शहरात झोपडी करून ते कुटुंबासह राहतात. त्यांच्या कुटुंबात दोन मुले आणि तीन मुली आहेत. भटक्या समाजातील हे कुटुंब रोज शहरात फिरून अत्तर विक्री केल्याशिवाय उदरनिर्वाह करू शकत नाही.

12 जानेवारी 2026 रोजी सकाळी मोठी मुलगी किराणा आणण्यासाठी घराबाहेर गेली; मात्र ती दिवसभर परतली नाही. आई-वडिलांनी सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांशी संपर्क साधला; तरीही तिचा पत्ता लागला नाही. अखेर लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित किराणा दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, मुलीने त्यांचा फोन वापरून एका मुलाशी संपर्क साधला आणि तो मुलगा तिला तेथून घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. (osmanabad News)

सदर मुलगी 13 वर्षे 9 महिने वयाची असून अल्पवयीन आहे. त्यामुळे संबंधित मुलाचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. मुलीचा शोध लागला नाही तर उस्मानाबाद येथे मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राज्य प्रवक्ते ॲड. नगरसेवक अरुण जाधव यांनी दिला. (osmanabad News)

यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा लोखंडे, युवकाध्यक्ष शितल चव्हाण, जिल्हा महासचिव नसीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष महादेव एडके, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंदुरकर, विधी सल्लागार ॲड. के. टी. गायकवाड, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कुंदन वाघमारे, जिल्हा संघटक कश्यप बनसोडे, युवक सदस्य जीवन कदम, मिलिंद रोकडे, मच्छिंद्र जाधव, अक्कलकोट तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, विद्यार्थी संघटना राज्यपूर्वक्ता रविराज पोटे, यशवंत इंगळे, हनुमंत जाधव तसेच उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: MaharashtraPoliticalusmanabadvanchitbahujanaghadivbaforindia
Previous Post

जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार

Next Post

दिल्ली मद्य धोरण प्रकरण: अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा; राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून ‘क्लीन चीट’

Next Post
दिल्ली मद्य धोरण प्रकरण: अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा; राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून 'क्लीन चीट'

दिल्ली मद्य धोरण प्रकरण: अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा; राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून 'क्लीन चीट'

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home