मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या राज्यकार्यकारणीची बैठक मंगळवारी दि.५ डिसेंबर रोजी मुंबई येथे पार पडणार आहे. राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना प्रंचंड प्रतिसाद मिळतोय.अकोला, मुंबई येथील सभांना लाखोंच्या संख्येने समूदाय जमला होता. त्याच दरम्यान सातारा, धुळे, सटाणा, सांगली येथील सभांनी सुध्दा प्रस्थापित पक्षांच्या छातीत धडकी भरवली होती.
मुंबईत राज्य कार्यकारणीची बैठक आगामी काळातील राजकीय रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे, अशी चर्चा सुरू आहे.
सर्व विरोधी पक्षांना वाटतंय की, वंचित बहुजन आघाडी सोबत असली पाहिजे पण, अजून तरी त्यावर कोणी पाऊल उचललं नाहीये. मुंबई येथे पार पडणाऱ्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्व असणार असे दिसत आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख राज्य पदाधिकारी यांच्यासह युवा नेते, सुजात आंबेडकर देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या बैठकीत काय निर्णय होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.