पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचे आज पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पुणे शहर व हडपसर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने वारकऱ्यांसाठी विशेष सेवा उपक्रम राबविण्यात आला.
वारकऱ्यांना राजगिरा लाडू, केळी, पाण्याच्या बाटल्या, वेफर्स तसेच वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. प्रियदर्शी तेलंग, शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, महासचिव विश्वास गदादे, विकास भेगडे, सतिश साबळे, पितांबर धिवार, नवनीत अहिरे, अजित पानसरे, सतिश रणवरे, शाम गोरे, नागेश भोसले, बी. पी. सावळे सर, अरविंद कांबळे, संदीप चौधरी, दिलीप क्षेत्रे, रवींद्र गायकवाड, कल्याण चौधरी, कोमल शेलार, शिंदे ताई, दादासाहेब गायकवाड, दिपक गायकवाड, राहुल दहिरे, प्रज्योत गायकवाड, योगेश वानखेडे आणि सुमित हतांगळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे वारी मार्गावरील हजारो वारकऱ्यांना दिलासा मिळाला.
Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका घेण्यासाठी...
Read moreDetails