Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

Election Commission : निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाही, जनतेच्या विरोधात – प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
June 23, 2025
in Uncategorized, बातमी, विशेष, सामाजिक
0
निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाही, जनतेच्या विरोधात – ॲड. प्रकाश आंबेडकर

निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाही, जनतेच्या विरोधात – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आता फक्त 45 दिवसांसाठी निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवले जाणार आहे. आयोगाने मोठा निर्णय घेत निवडणूकीचे सर्व व्हिडिओ आणि फोटो 45 दिवसात डिलीट करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय लोकशाही, पारदर्शकता आणि जनतेच्या विश्वासाच्या विरोधात असल्याचा त्यांनी म्हटले आहे.प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले की, “मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेणे ही जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोगाने पारदर्शकतेच्या विरोधात पाऊल उचलणे हा गंभीर चिंतेचा विषय आहे.

“डिसेंबर २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक नियम १९६१ मध्ये केलेल्या सुधारणेमुळे अनेक निवडणूक संबंधित नोंदींवर सार्वजनिक प्रवेश प्रतिबंधित झाला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांनी १६ जानेवारी २०२५ रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर नेत्यांना पत्र लिहून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील ७५,९७,०६७ मतांची संध्याकाळी 5 नंतर झालेली वाढ व सुधारित नियमावलीबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या या सूचनांकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ॲड. आंबेडकर यांनी सूचित केले की, “आज त्या सर्व शंका पुन्हा समोर येत आहेत.”दरम्यान, विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 नंतर वाढलेल्या मतदानाच्या संदर्भात चेतन चंद्रकांत अहिरे विरुद्ध भारतीय संघ व इतर या सुरू असलेल्या केसची महत्त्वपूर्ण पुढील सुनावणी सोमवार, २३ जून २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. याप्रकरणी याआधी उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला न्यायालयात उत्तर द्यायला सांगितले होते.

Tags: democracyElection commissionmumbaiPrakash Ambedkarvbaforindia
Previous Post

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी वारी निमित्त वंचित बहुजन आघाडीकडून वारकऱ्यांसाठी फराळ वाटप आणि वैद्यकीय सेवा

Next Post

खोपोली शहरात वंचित बहुजन आघाडीच्या शाखांचे उद्घाटन!; नागरिकांचा मोठा प्रतिसाद!

Next Post
खोपोली शहरात वंचित बहुजन आघाडीच्या शाखांचे उद्घाटन!; नागरिकांचा मोठा प्रतिसाद!

खोपोली शहरात वंचित बहुजन आघाडीच्या शाखांचे उद्घाटन!; नागरिकांचा मोठा प्रतिसाद!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
बातमी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

by mosami kewat
August 14, 2026
0

नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू...

Read moreDetails
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home